आदर्श ग्राम निर्मितीचा संकल्प
By Admin | Updated: November 26, 2014 23:09 IST2014-11-26T23:09:11+5:302014-11-26T23:09:11+5:30
ग्रामपंचायत सजेगाव खुर्द येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ४६ व्या पुण्यतिथीनिमित्त सोमवारी (दि.२४) कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी भजन, कीर्तनातून जनजागृती करीत आदर्श

आदर्श ग्राम निर्मितीचा संकल्प
रात्रभर भजन-कीर्तन : राष्ट्रसंत तुकडोजी पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम
गोंदिया : ग्रामपंचायत सजेगाव खुर्द येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ४६ व्या पुण्यतिथीनिमित्त सोमवारी (दि.२४) कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी भजन, कीर्तनातून जनजागृती करीत आदर्श ग्राम निर्मितीचा संकल्प करण्यात आला.
पहाटे ५.३० वाजता सामुदायिक ध्यानपाठ सुरेश सोनवाने व तालुका सेवाधिकारी भोजलाल बिसेन यांच्या सहकार्याने पार पडले. दुपारी १ वाजता जिल्हा प्रचार प्रमुख भोजराज बघेले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी देवराम कटरे, भोजलाल बिसेन, नानू बघेले, गोरेगाव तालुका प्रचारक लिखीराम पटले सचिव उपस्थित होते. गुरुदेव सेवा मंडळ सेजगाव, मुंडीपार व डोंगरगाव येथील सदस्यांनी भजने सादर केली. सामुदायिक प्रार्थना सायंकाळी ६ वाजता आचार्य एम.ए. ठाकूर यांच्या मार्गदर्शनात पार पडली. चिंतनपर भाषण प्रचारक चंद्रशेखर आसेकर यांनी केले. रात्रीला हभप चंदन चौधरी महाराज, हभप प्रेमलाल घरत पाथरी, हभप चमरु बिसेन, हभप कटरे महाराज यांचे कीर्तन झाले. रात्री १२.३० वाजता राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.
गावातून रामधुनची दिंडी निघाली या सोहळ्यात श्रीगुरुदेव सेवामंडळ सेजगाव खुर्द, भानपुर, मुंडीपार, रतनारा, जांभूळपाणी, डोंगरगाव, पाथरी, दागोटोला, मुर्री, दुर्गामंडळ, सेजगाव यांनी सहभाग घेतला होता. अत्यंत प्रभावी भजने सादर करण्यात आले. सगळ्या मंडळाकडून व राष्ट्रसंताचे दोन भजने सादर करण्यात आले. आचार्य एम.एम. ठाकूर गुरुजींच्या अमृतवाणीने गोपाल काल्याचे किर्तन करण्यात आले. त्यात राष्ट्रीय एकात्मता, ग्राम स्वरंक्षण दलाची गरज, समता, बंधुता, ग्राम हेच मंदिर, ग्राम जनतेचा सांस्कृतीक, आध्यामिक व पारमार्थिक विकास करुन ग्राम आदर्श कसे करता येईल यावर विशेष भर देण्यात आला.
समारोपीय कार्यक्रमास विनोद अग्रवाल, बबलू रहांगडाले, संदीप बघेले, संजय कुलकर्णी, भाऊराव कठाने, रामेश्वर चौरागडे, भोजराज बघेले, देवराम कटरे, अशोक हरिणखेडे, धनंजय रिनाईत, रमेश चिल्हारे, मुन्ना सोनवाने, लिलाधर बोपचे, छगन पटले आदी मंडळी उपस्थित होते. परिसरातील तसेच गावातील मंडळी मोठ्या संख्येत उपस्थित होती.
यावेळी विनोद अग्रवाल यांनी जनतेला तुकडोजी महाराजांचे तत्वज्ञान तेच ग्रामगीतेचे तत्वज्ञान घरा-घरापर्यंत जाण्यासाठी सामूहिक प्रार्थना व ज्ञान अत्यावश्यक असून प्रत्येकाने सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. प्रत्येक घरात ग्रामगीता असणे आवश्यक असल्याचे आचार्य एम.ए. ठाकूर यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुकाध्यक्ष भोजलाल बिसेन, मुन्ना सोनवाने व गुरुदेव सेवा मंडळाच्या सर्व सेवकांनी सहकार्य केले. राष्ट्रवंदनेही कार्यक्रमाची सांगता झाली.या पुण्यतिथी महोत्सवात महाप्रसादाच आयोजन करण्यात आले होते. (तालुका प्रतिनिधी)