शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी निवेदन
By Admin | Updated: July 8, 2016 01:52 IST2016-07-08T01:52:37+5:302016-07-08T01:52:37+5:30
तालुका काँग्रेस पक्षाची सभा मंगळवार (दि.५) येथील सहषराम कोरोटे यांच्या निवासस्थानी घेण्यात आली.

शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी निवेदन
तालुका काँग्रेसचा पुढाकार : ककोडी ते देवरीपर्यंत काढली पदयात्रा
देवरी : तालुका काँग्रेस पक्षाची सभा मंगळवार (दि.५) येथील सहषराम कोरोटे यांच्या निवासस्थानी घेण्यात आली. सभेत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आणि सुशिक्षित बेरोजगारांच्या विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. यानंतर समस्या सोडविण्यासाठी एक निवेदन जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहषराम कोरोटे व माजी आ. रामरतन राऊत यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देवरीचे उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत पाठविण्यात आले.
निवेदनानुसार, तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्येला धरून ककोडी ते देवरीपर्यंत पदयात्रा मोर्चा काढण्यात आला. आपल्या समस्येचे निवेदन देवरीचे उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी यांच्यामार्फत शासनाला पाठविण्यात आले. तसेच शेतकऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. यात उपस्थित पालकमंत्री राजकुमार बडोले व आ. संजय पुराम यांना शेतकऱ्यांनी समस्येबाबत माहिती दिली. तेव्हा त्यांनी या विषयावर योग्य सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनाची वचनपूर्तता अद्याप करण्यात आली नाही, असे सांगण्यात आले.
तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपले पीक बिमा काढले. सदर तालुका दुष्काळग्रस्त घोषित झाल्यावरसुध्दा शासनाकडून तालुक्यातील शेतकऱ्यांना कसल्याही प्रकारची आर्थिक मदत मिळालेली नाही. तरी शासनाने शेतकऱ्यांना २० हजार हेक्टरी मदत करावी, पीक विम्याची रक्कम त्वरित मिळावी, रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कमीतकमी २०० दिवस काम मिळावे, शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी व्हावी आणि शेतकऱ्यांना त्यांच्या धानाचे भाव ३ हजार रूपये मिळायलाच हवे, अशा विविध मागण्यांचा समावेश आहे.
सदर मागण्या १३ जुलैपर्यंत पूर्ण न झाल्यास काँग्रेस पक्षाच्या वतीने आ. गोपालदास अग्रवाल, माजी मंत्री नितीन राऊत, जिल्हा अध्यक्ष बाबा कटरे, माजी आ. रामरतन राऊत, जिल्हा महासचिव सहषराम कोरोटे, भरतसिंग दुधनाग, तालुकाध्यक्ष राधेश्याम बगडीया आणि जिल्हा महिला अध्यक्ष उषा शहारे यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन करण्यात येईल व याची संपूर्ण जवाबदारी शासनाची राहील, अशा ईशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
सदर निवेदन मंगळवार (दि.५) देवरीचे उपविभागीय अधिकारी यांचे प्रतिनिधी तहसीलदार संजय नागतिळक यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आले.
निवेदन सादर करणाऱ्या शिष्टमंडळात जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहषराम कोरोटे, माजी आ. रामरतन राऊत, जिल्हा परिषद सदस्य दीपकसिंग पवार, माधुरी कुंभरे, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष उषा शहारे, नगर पंचायतचे उपाध्यक्ष ओमप्रकाश रामटेके, आदिवासी विकास महामंडळाचे संचालक भरतसिंग दुधनाग, तालुकाध्यक्ष राधेश्याम बगडीया, माजी जि.प. सदस्य संदीप भाटीया, रंजित कासम, जीवन सलामे, वैभव जैन, नर्मदाप्रसाद शमार, बळीराम कोटवार, धनपत भोयर, दिलीप संगीडवार, सुरेंद्र बंसोड, चैनसिंग मडावी, अविनाश टेंभरे, तुकाराम वाघमारे, सोहन चौरे, विठ्ठल जनबंधू, कमलेश पालीवाल, बबलू कुरैशी, राजेश शहाणे, कुलदीप गुफा, अरविंद उके, नितीन धुर्वे, अनिल कासम, घनश्याम फरकुंडे, मोहन कुंभरे, मानिक आचले, छन्नुलाल नेवारगडे, जित्ते भाटीया आदी अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)