जिल्हा शिक्षक परिषदेचे उपशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

By Admin | Updated: September 21, 2014 23:53 IST2014-09-21T23:53:37+5:302014-09-21T23:53:37+5:30

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा शाखेच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी जि.प. गोंदियाचे उपशिक्षणाधिकारी अरूण फटे यांना निवेदन दिले.

Request for District Teachers' Council sub-officers | जिल्हा शिक्षक परिषदेचे उपशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

जिल्हा शिक्षक परिषदेचे उपशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

गोंदिया : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा शाखेच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी जि.प. गोंदियाचे उपशिक्षणाधिकारी अरूण फटे यांना निवेदन दिले.
निवेदनानुसार, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मान्यता सूची २०१३-१४ रद्द करून मान्यता सूची २०११-१२ कायम ठेवावे. कर्मचाऱ्यांना अतिरिक्त करण्यात येवू नये. शिक्षकांना अतिरिक्त ठरविताना सेवाजेष्ठतेचे पालन करून यादी तपासूनच अतिरिक्त ठरवावे. शिक्षण सेवकांच्या सेवा समाप्त न करता त्यांना सेवेत संरक्षण द्यावे.
आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी देण्यात यावे. वेतन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून न करता राष्ट्रीयकृत बँकेतून करण्यात यावे. एटीएमची सेवा पुरविण्यात यावी. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च व एप्रिलच्या १० टक्के महागाई भत्याची थकबाकी दिवाळीपूर्वी रोखीने द्यावी. केंद्राप्रमाणे जुलै २०१४ चा सात टक्के महागाई भत्ता रोखीने दसऱ्यापूर्वी लागू करावा आदी मागण्यांचा समावेश आहे.
निवेदन देतेवेळी शिष्टमंडळात नीताराम अंबुले, सतीश मंत्री, लीलेश्वर बोरकर, अरूण पारधी, दिनेश कोहळे, गुणेश्वर फुंडे, छत्रपाल बिसेन, दूधराम राऊत, आनंद बिसेन, सनत मुरकुटे, आनंद ठाकूर, पांडुरंग गहुकर, हेमंत राजगिरे, योगेश चौधरी, मधूकर कुरूसुंगे, डी.एस. मस्के व इतर शिक्षक उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Request for District Teachers' Council sub-officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.