वन अधिकारी-कर्मचारी संघटनेचे जिल्हाधिकाºयांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 22:13 IST2017-09-21T22:12:56+5:302017-09-21T22:13:10+5:30
राज्यातील मागासवर्गीय कर्मचाºयांच्या पदोन्नती, आरक्षण मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केले. यासंदर्भात राज्य शासनाने आपली बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडून आरक्षण अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करावे,.....

वन अधिकारी-कर्मचारी संघटनेचे जिल्हाधिकाºयांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
निंबा (तेढा) : राज्यातील मागासवर्गीय कर्मचाºयांच्या पदोन्नती, आरक्षण मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केले. यासंदर्भात राज्य शासनाने आपली बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडून आरक्षण अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्व बंजारा समाजाचे अधिकारी कर्मचारी यांनी वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटना जिल्हा गोंदियाच्या वतीने जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांना निवेदन दिले. या संबंधात राज्यभरातून मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन मागणी सादर करण्यात आली.
निवेदन देतेवेळी कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर राठोड, जिल्हा सचिव सुनील राठोड, कोषाध्यक्ष विलास राठोड, संजय राठोड, गणेश पवार, जाधव, आकाश चव्हाण तसेच इतर तालुक्यातील बंजारा कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी सर्वांनी एकजुटीने सामाजिक संघटनेचे कार्य करुन समाजाचा विकास कसा करता येईल, याबद्दल चर्चा करण्यात आली.