पांगोली वाचविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
By Admin | Updated: March 11, 2016 02:25 IST2016-03-11T02:25:58+5:302016-03-11T02:25:58+5:30
पांगोली नदीची सिंचन क्षमता वाढविण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून समाजोन्नती बहुउद्देशिय ग्रामीण व शहरी संस्था गोंदिया शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे

पांगोली वाचविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
गोंदिया : पांगोली नदीची सिंचन क्षमता वाढविण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून समाजोन्नती बहुउद्देशिय ग्रामीण व शहरी संस्था गोंदिया शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मंगळवार (दि.८) रोजी सदर संस्थेच्या वतीने पांगोली नदीची सिंचन क्षमता वाढविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
सदर निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) विलास ठाकरे यांनी स्वीकारले. तसेच मुख्यमंत्री, जलसिंचन मंत्री व सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री बडोले यांनासुद्धा निवेदन पाठविण्यात आले. यापूर्वी सदर संस्थेच्या वतीने ३ मार्च २०१५ रोजीसुद्धा निवेदन देण्यात आले होते. तसेच लवकरच जि.प. अध्यक्ष, जिल्ह्यातील आमदार व खासदार यांनाही निवेदन सादर करण्यात येणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
निवेदन देतेवेळी शिष्टमंडळात संस्था सचिव तिर्थराज उके, शेखर वाढवे, संदेश भालाधरे, राकेश टेंभरे, भागवत मेश्राम, रॉबिन भवरजार, प्रल्हाद बनोटे, धर्मराज लिल्हारे, राजेंद्र मानकर, डिंपल उके तसेच शेतकरी व नागरिक उपस्थित होते.
सदर अभियानासाठी संस्था सचिव तिर्थराज उके, अध्यक्ष जैयवंता उके, डिंपल उके, दिनेश फरकुंडे, दिनेश फरकुंडे, गोपाल बनकर, मिठेश्वर नागरिकर, भोजू राऊत, उमेश मेश्राम, संजय कावळे, देवराम मानकर, रघुनाथ मेश्राम, टेकचंद लाडे, हुमराज बावणकर, मुकेश उके, संदेश भालाधरे, राकेश टेंभरे, भागवत मेश्राम आदी सक्रीय कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. (प्रतिनिधी)