संयुक्त रिपब्लिकन संघटनेचे तहसीलदारांना निवेदन
By Admin | Updated: November 6, 2014 22:58 IST2014-11-06T22:58:14+5:302014-11-06T22:58:14+5:30
अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडे येथील दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ संयुक्त रिपब्लिकन संघटना तिरोड्याच्या वतीने तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी ३ नोव्हेंबर रोजी निवेदन देण्यात आले.

संयुक्त रिपब्लिकन संघटनेचे तहसीलदारांना निवेदन
तिरोडा : अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडे येथील दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ संयुक्त रिपब्लिकन संघटना तिरोड्याच्या वतीने तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी ३ नोव्हेंबर रोजी निवेदन देण्यात आले.
जवखेडे येथील जाधव कुटुंबातील मुलगा, आई व वडील यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्याकांडामुळे दलित समाजामध्ये तीव्र असंतोष पसरलेला आहे. ही घटना मानवतेला कलंकित करणारी असून अशोभनीय, लाजीरवाणी व दु:खद घटना आहे. हत्याकांडातील आरोपींना त्वरीत अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, यासाठी संयुक्त रिपब्लीकन संघटना तिरोड्याच्या वतीने तहसील कार्यालय परिसरात तीव्र निषेध व्यक्त करून तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठविण्यात आले.
निवेदन देतेवेळी संयुक्त रिपब्लिकन संघटनेचे अध्यक्ष तिर्थराज बागडे, सचिव के.के. वैद्य, उपाध्यक्ष महेंद्र बडगे, संघटक गुणवंतराव बंसोड, विरेंद्र बागडे, हरिचंद्र सूर्यवंशी, चित्तरंजन मेश्राम, सत्यवान मेश्राम, राजकुमार रोडगे, राजेंद्र रामटेके, रोशन रामटेके, राजेश रामटेके, दानीयाल बंसोड, तारेंद्र गेडाम, अविनाश बंसोड, संगम उईके, प्रल्हाद वैद्य उपस्थित होते.
गोंदिया : अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडे (पाथर्डी) येथील तिहेरी हत्याकांड जातीय मानसिकतेचे रौद्र रूप असल्यामुळे जिल्हा राष्ट्रवादी दलित आघाडीचे अध्यक्ष मनोहर वालदे यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला.
श्रीनगर येथील जनसंपर्क भेटीत या प्रकरणावर असंतोष व्यक्त केला. गेल्या २० आॅक्टोबरला दलित कुटुंबातील संजय जाधव, पत्नी जयश्री व मुलगा सुनील यांची झोपेत क्रूर हत्या करण्यात आली. या हत्याकांडामुळे दलित समाजात उद्रेकाची भावना पसरली आहे.
आरोपींना त्वरीत अटक करा, अशा मागणीचे निवेदन वरिष्ठांना पाठविण्यात आले असून निवेदनात महेंद्र नारनवरे, दिगंबर मेश्राम, चुनीलाल धमगाये, गंगाधर भोयर, शालीक गंगाभोज, सुकराम बावणकर, देवेंद्र जांभुळकर, ललीत साखरे, राजू बागडे, येशूराम बडोले, आकाश टेंभुर्णे, महेंद्र टेंभेकर आदींनी याप्रकरणी तातडीने आरोपींना अटकेची मागणी केली आहे.