नमुना न घेताच अहवाल दाखविला सकारात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:48 IST2021-05-05T04:48:09+5:302021-05-05T04:48:09+5:30

गोंदिया : संसर्गाचा वेग जिल्ह्यात कायम आहे. अशातच चाचण्याही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे आरोग्य विभागावर अधिक ताण वाढला ...

The report showed positive without taking a sample | नमुना न घेताच अहवाल दाखविला सकारात्मक

नमुना न घेताच अहवाल दाखविला सकारात्मक

गोंदिया : संसर्गाचा वेग जिल्ह्यात कायम आहे. अशातच चाचण्याही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे आरोग्य विभागावर अधिक ताण वाढला आहे. अशातच रजेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नमुना तपासणी घेतला नसतानाही संबंधिताला सकारात्मक अहवाल दिल्याचा प्रकार उघडकीस आल्याने आरोग्य यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सविस्तर असे की तालुक्यातील गर्रा येथील रहिवासी सचिन बोपचे या युवकाने २२ एप्रिल रोजी काका कुंजीलाल बोपचे याला आरटीपीसीआरची तपासणी करण्यासाठी घेऊन गेला होता तसेच सचिनने चाचणीसाठी आपला अहवाल दिलेला नव्हता. मात्र प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने सचिनचा अहवाल सकारात्मक दाखविण्यात आला. यामुळे त्याची मानसिक स्थिती ढासळली असून या प्रकरणाची योग्य चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच त्यांना सेवेतून मुक्त करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हाधिकाऱ्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून बोपचे यांनी केली आहे.

Web Title: The report showed positive without taking a sample