सात-बारावर शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक नोंदवा
By Admin | Updated: January 10, 2015 22:58 IST2015-01-10T22:58:54+5:302015-01-10T22:58:54+5:30
शेतकऱ्यांच्या सात-बारावर गट क्रमांकांप्रमाणेच त्यांचा बँक खाता क्रमांक नोंदविण्यात यावा अशी मागणी ग्राहक पंचायतने केली आहे. यासंदर्भात ग्राहक पंचायतच्या तालुका प्

सात-बारावर शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक नोंदवा
परसवाडा : शेतकऱ्यांच्या सात-बारावर गट क्रमांकांप्रमाणेच त्यांचा बँक खाता क्रमांक नोंदविण्यात यावा अशी मागणी ग्राहक पंचायतने केली आहे. यासंदर्भात ग्राहक पंचायतच्या तालुका प्रतिनिधीमंडळाने तहसीलदार शुभांनी आंधळे यांना निवेदन दिले.
शासकीय योजनांचा लाभ व अनुदान घेता यावा यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खाते क्रमांकाची नोंद पटवाऱ्यांमार्फत करवून घ्यावी लागते.
मात्र पटवारी वेळेवर उपलब्ध होत नसल्याने शेतकरी शासनाच्या लाभापासून वंचीत राहतात. हाच प्रकार घडत असून अतिवृष्टी व दुष्काळ यासह अन्य अनुदानापासून शेतकरी आजही वंचीत आहे. शेतकऱ्यांचे खाते यंत्रणेकडे नसल्याने हा गोंधळ उडतो.
अशात शेतकऱ्यांच्या सात-बारावर त्यांच्या गट क्रमांकासह बँक खाता क्रमांक राहील्यास शेतकरी व पटवारी दोघांनाही त्रास होणार नाही. करिता सात-बारावर बँक खाते क्रमांक नोंदविण्यात यावे अशी मागणी ग्राहक पंचायतने केली. (वार्ताहर)