तिन्ही कृषी कायदे रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:46 IST2021-02-05T07:46:52+5:302021-02-05T07:46:52+5:30

देवरी : केंद्र सरकारने बनविलेले तीन कृषी कायदे रद्द करा या मागणीला धरून शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ तालुका शिवसेनेच्यावतीने बुधवारी ...

Repeal all three agricultural laws | तिन्ही कृषी कायदे रद्द करा

तिन्ही कृषी कायदे रद्द करा

देवरी : केंद्र सरकारने बनविलेले तीन कृषी कायदे रद्द करा या मागणीला धरून शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ तालुका शिवसेनेच्यावतीने बुधवारी (दि. २७) येथील परसटोला येथून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर शेतकरी व शिवसैनिकांनी मोर्चा काढला. तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने निवेदन सादर करण्यात आले.

परसटोला येथून निघालेल्या या मोर्चाचे चिचगड मार्गावरील राणी दुर्गावती चौकात सभेत रूपांतर होऊन या सभेत तालुका प्रमुख सुनील मिश्रा यांनी शिवसेना जरी सत्तेत असली तरी जनतेच्या हिताकरिता सदैव रस्त्यावर उतरेल असे म्हटले. जिल्हा प्रमुख सुरेंद्र नायडू यांनी, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शेतकऱ्यांच्या हिताकरिता आंदोलन आम्ही करीत राहू असे म्हटले. दरम्यान, शिवसेनेच्या चिचगड जि. प. क्षेत्र शाखेतून आलेल्या शेतकरी व शिवसैनिकांनी चिचगड येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेत सचिव पदावर कार्यरत खंडारे यांना पायऊतार करण्यासंबंधात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना निवेदन दिले. नंतर हे निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना देऊन याबाबत चौकशी करून कारवाई करण्यासंबंधात सूचना दिल्या. यानंतर शिवसेनेच्यावतीने शेतकऱ्यांच्या विरोधात केंद्र सरकारने बनविलेले तिन्ही कृषी कायदे रद्द करा या मागणीसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने निवेदन दिले. निवेदन देताना जिल्हा प्रमुख सुरेंद्र नायडू, तालुका प्रमुख सुनील मिश्रा, शहर प्रमुख राजा भाटीया, उपतालुका प्रमुख शंभू घाटा, डालचंद मडावी, विनोद गौर, किसान सभेचे तालुका प्रमुख संजय मेहर, प्रचार प्रसार प्रमुख भुमेश पटले, शहर समन्वयक परवेझ पठाण, नरेश बन्सोड, विभाग प्रमुख गोविंद बन्सोड, माजी उपसभापती गणेश सोनबोईर, प्रकाश सोनबोईर, शिवसैनिक महेश फुन्ने, विलास राऊत, राजा मिश्रा, छन्नू नेवरगडे, संजय भांडारकर, शहर महिला आघाडी प्रमुख प्रीती उईके, सलमा राऊत, प्रीती नेताम, वंदना राऊत, स्विटी नेवरगडे, चिचगड क्षेत्रातील शेतकरी अनिल धोटे, अंकित धोटे, सदरू बंदे अली, नीलेश मोहुर्ले, बलदेव शाहू, जितेंद्र उईके यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी व शिवसैनिक उपस्थित होते. संचालन तालुका प्रमुख सुनील मिश्रा यांनी केले. आभार राजा भाटीया यांनी मानले.

Web Title: Repeal all three agricultural laws

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.