शेतकऱ्यांची अडचण दूर कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 22:08 IST2019-07-15T22:07:09+5:302019-07-15T22:08:08+5:30
जिल्ह्यात चांगला पाऊस पडू दे व चांगले पीक होऊन अडचणीत असलेल्या माझ्या शेतकरीबांधवाना दिलासा मिळू दे, असे साकडे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भगवान जगन्नाथ यांची पूजन करून घातले.

शेतकऱ्यांची अडचण दूर कर
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात चांगला पाऊस पडू दे व चांगले पीक होऊन अडचणीत असलेल्या माझ्या शेतकरीबांधवाना दिलासा मिळू दे, असे साकडे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भगवान जगन्नाथ यांची पूजन करून घातले.
येथील श्री जगन्नाथ पूजा समितीच्यावतीने श्री जगन्नाथ यांची सार्वजनिक रथयात्रा काढली असता आमदार अग्रवाल यांनी यात्रेत भाग घेतला.
याप्रसंगी त्यांनी भगवान जगन्नाथ यांची पूजा करून विश्व कल्याणाची कामनाही केली. तसेच हाताने रथ ओढून यात्रेत भाग घेतला.
याप्रसंगी मुकेश नायक, रॉकी नायक, डॉ. दिपक बहेकार, मनिष गुप्ता, राकेश ठाकुर, अजय अग्रवाल, आलोक मोहंती, श्रीनिवास मुंदडा, शिनू राव, शकील मंसुरी,सुनील भालेराव, मंटू पुरोहीत, क्रांती जायस्वाल, महेश अग्रवाल, देवा रूसे, भागवत मेश्राम, सचिन मिश्रा, व्यंकट पाथरू, सुशिल रहांगडाले, डिल्लू गुप्ता, रामू लिल्हारे, ललिंद्र शेंडे, बी.बी.साहू, एन.एन.दास, के.सी.पटनाईक, मनोज पटनाईक, रजत मोहंती, अभिलाष मोहंती, खेमेंद्र परिहार, विक्रम मोहंती, विभूती गरनाईक, हरीष तुळसकर, प्रकाश रहमतकर, अशोक चौधरी, अजय गौर, जहीर अहमद, सचिन रहांगडाले, चिकू अग्रवाल, विकास बंसल आदि उपस्थित होते.