धार्मिक स्थळ व शाळांच्या जवळील बीअर बार हटवा!

By Admin | Updated: January 12, 2017 00:20 IST2017-01-12T00:20:05+5:302017-01-12T00:20:05+5:30

शाळा व धार्मिक स्थळाजवळ बिअर बार व दारू दुकान असल्याने याचा दुष्परिणाम समाज मनावर मोठ्या प्रमाणात पडत आहे.

Remove beer bars near religious sites and schools! | धार्मिक स्थळ व शाळांच्या जवळील बीअर बार हटवा!

धार्मिक स्थळ व शाळांच्या जवळील बीअर बार हटवा!

 उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : सकल समाज व गायत्री परिवाराचा पुढाकार
गोंदिया : शाळा व धार्मिक स्थळाजवळ बिअर बार व दारू दुकान असल्याने याचा दुष्परिणाम समाज मनावर मोठ्या प्रमाणात पडत आहे. राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील दारू विक्री शासनाने बंद केली. त्याचप्रमाणे धार्मिक स्थळ व शाळा परिसरातून दारू विक्री बंद करावी अशी मागणी करणारे निवेदन आमगाव येथील गायत्री परिवार व सकल महिला समाजातर्फे उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे यांना देण्यात आले.
आमगाव येथील रिसामा, कुंभारटोली, बनगाव व आमगाव येथील दारू दुकान व बिअर बारमुळे नागरिकांना त्रास होतो. हा त्रास टाळण्यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात अध्यक्ष गीता कलंत्री, जिल्हा संयोजिका वेदवती पटले, सुषमा गुप्ता, शितला बिसेन, जना खेडीकर, रेखा चौव्हाण, संध्या भदोरीया, शारदा रिनाईत, लिला ब्राम्हणकर, पवन रेखा पटले, योगमाया पटले, परसराम पटले, शिक्षक बिसेन, मधु बिसेन व इतर सदस्यांचा समावेश होता.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Remove beer bars near religious sites and schools!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.