कर्जवसुली थांबविण्याचे आदेश
By Admin | Updated: March 27, 2017 00:59 IST2017-03-27T00:59:39+5:302017-03-27T00:59:39+5:30
जिल्ह्यात अनेक ठिकाणी सहकारी बँका शेतकऱ्यांकडून जबरन कर्जवसुली करीत असल्याचे प्रकार घडत आहेत.

कर्जवसुली थांबविण्याचे आदेश
पुराम यांचा पाठपुरावा : सहकारमंत्र्याचे जिल्हा निबंधकांना आदेश
सालेकसा : जिल्ह्यात अनेक ठिकाणी सहकारी बँका शेतकऱ्यांकडून जबरन कर्जवसुली करीत असल्याचे प्रकार घडत आहेत. आमदार संजय पुराम यांनी राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची भेट घेऊन जबरन कर्ज वसुली थांबविण्याची मागणी केली. यावर नामदार देशमुख यांनी जिल्हा उपनिबंधकांना जबरन कर्ज वसुली करू नये असे आदेश दिले.
बँकेचे वसुली अधिकारी कर्जवसुलीच्या नावावर घरातील कोणतीही वस्तु सुद्धा जबरन उचलून नेत आहेत. त्यामुळे कर्ज घेणारे शेतकरी भयभीत झालेले दिसत आहेत. सर्व बाबीच्या तक्रारी आमदार पुराम यांच्या यांच्याकडे पोहोचल्या व त्यांनी तातडीने राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची भेट घेवून निवेदन देत जबरन कर्ज वसुली थांबविण्यासाठी योग्य पाऊस उचलावे असा आग्रह केला.
आ. पुराम यांच्या निवेदनावर तातडीने विचार करीत नामदार देशमुख यांंनी जिल्हा उपनिबंधकांना आदेश निर्गमित करुन सर्व सामान्य शेतकऱ्यांना मानसिक त्रास देणारे कोणतेही पाऊल न उचलता जबरन कर्जवसुली करू नये. तसेच कर्जवसुलीच्या नावावर केव्हाही शेतकऱ्यांच्या घरात घुसून घरातील कोणतीही वस्तु उचलून नेऊ नये असे आदेश दिले.सध्या मार्च महिन्याचा अखेर चालत असून आर्थिक वर्ष समाप्तीपूर्वी जिल्ह्यातील मध्यवर्ती सहकारी बँक आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी जबरन कर्जवसुलीचा अभियान सुरू केला आहे. सहकार मंत्र्यांच्या आदेशावरुन काय पाऊल उचलतात हे पुढे पाहावे लागेल. (तालुका प्रतिनिधी)