हॉट्सअ‍ॅपवरून धार्मिक स्थळाचा अवमान

By Admin | Updated: May 17, 2015 01:50 IST2015-05-17T01:50:06+5:302015-05-17T01:50:06+5:30

एका विशिष्ट धर्माच्या धर्मस्थळाची अवमानना करून ते फोटो व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पसरविणाऱ्या दोघांवर शहर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

Religious place contempt for Hotswap | हॉट्सअ‍ॅपवरून धार्मिक स्थळाचा अवमान

हॉट्सअ‍ॅपवरून धार्मिक स्थळाचा अवमान

गोंदिया : एका विशिष्ट धर्माच्या धर्मस्थळाची अवमानना करून ते फोटो व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पसरविणाऱ्या दोघांवर शहर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. यातील एक आरोपी गोंदियातील असून दुसरा जळगाव येथील आहे.
येथील आयलानी किराणा स्टोर्स समोर राहणाऱ्या हितेश गुरूमुखदास डोडानी (२५) याने आपला मोबाईल क्रमांक ९०२१२१४१४४ वरून व्हॉट्सअ‍ॅपवर शुक्रवारी सकाळी ११.४९ वाजता दरम्यान सद्दाम अयुब शेख (३२) या तरूणाला एक फोटो पाठवला. या फोटोत मुस्लीम बांधवांच्या धार्मिक स्थळाच्या फोटोची अवमानना करण्यात आली होती.
या प्रकारामुळे मुस्लीम समाजातील लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याने शेकडो मुस्लीम बांधवांनी शनिवारी (दि.१६) दुपारी पोलीस ठाणे गाठले. या संदर्भात मुश्लीम समाजातील वरिष्ठ नागरिकांनी प्रभारी उपविभागीय अधिकारी दीपक गिऱ्हे यांच्याशी चर्चा केली.
यावेळी रामनगरचे ठाणेदार किरणकुमार कबाडी, शहर ठाण्याचे ठाणेदार अविनाश काळदाते, विशेष पथकाचे पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांनी मुस्लीम बांधवांची समजूत घालून परिस्थिती नियंत्रणात आणत त्वरीत भादंविच्या कलम २९५ अ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणी हितेश डोडानी यास त्वरीत अटक करण्यात आली. तर जळगाव येथील मोबाईल क्रमांक ८१८०९०२५२९ धारकावरही शहर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Religious place contempt for Hotswap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.