शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

आरोग्य सेवा देणे डॉक्टरांचा धर्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 5:00 AM

सोमवारी (दि.३०) सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित डॉ.आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार व जिल्हा गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम सन २०१८-१९ अंतर्गत कायाकल्प पुरस्कार वितरण वितरण सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी एस.ई.हाश्मी यांनी केले.

ठळक मुद्देसीमा मडावी : आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : २४ तास आरोग्य सेवा देणे हे डॉक्टरांचे काम आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस काम करुन रुग्णांना सेवा देऊन आपला धर्म पाळावा. चांगल्या कामाची पावती ही पुरस्काराच्या माध्यमातून दिली जाते. असे उद्गार जि.प.अध्यक्ष सीमा मडावी यांनी काढले.सोमवारी (दि.३०) सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित डॉ.आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार व जिल्हा गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम सन २०१८-१९ अंतर्गत कायाकल्प पुरस्कार वितरण वितरण सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी एस.ई.हाश्मी यांनी केले.प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.उपाध्यक्ष अल्ताफ हमीद, आरोग्य व शिक्षण सभापती रमेश अंबुले, महिला बाल कल्याण सभापती लता दोनोडे, जि.प.सदस्य विजय लोणारे, जियालाल पंधरे, तेजुकला गहाणे, डॉ. अर्चना पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी श्याम निमगडे उपस्थित होते. सभापती रमेश अंबुले यांनी तिरोडा उपजिल्हा रुग्णालयाची प्रसंशा केली. डॉ. अर्चना पाटील यांनी या वेळी मार्गदर्शन केले.केशोरीला दोन लाखांचा पुरस्कारनक्षलग्रस्त दृष्ट्या अतिसंवेदनशील असलेल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी प्राथमिक आरोग्य केंद्राला कायाकल्प योजनेंतर्गत प्रथम पुरस्कार म्हणून दोन लाख रुपये देण्यात आले आहे. तिरोडा उपजिल्हा रुग्णालयाला डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आनंदीबाई जोशी पुरस्कारात प्राथमिक आरोग्य केंद्रातून भानपूर प्रथम, द्वितीय केशोरी प्राथमिक आरोग्य केंद्र,तृतीय शेंडा प्राथमिक आरोग्य केंद्र तर नऊ उपकेंद्रांना प्रोत्साहन पर पुरस्कार देण्यात आला.उपकेंद्रात दल्ली उपकेंद्राला १५ हजार, लाखेगाव १० हजार, फुलचूर ५ हजार,कायाकल्प योजनेंतर्गत कालीमाटी, शेंडा, महागाव, मुल्ला, काटी, ठाणा, दासगाव, चोपा या प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा प्रोत्साहनपर पुरस्कार व स्मृतिचिन्ह देऊन गौरविन्यात आले.मातृवंदन योजनेत तिरोडा प्रथम२ ते ८ डिसेंबर दरम्यान आयोजित प्रधानमंत्री मातृवंदन योजनेच्या सप्ताहात उत्कृष्ट काम करणाºया तिरोडा येथील तालुका नियंत्रण पथक, आमगाव तालुका नियंत्रण पथक यांना प्रथम पुरस्कार, गोरेगाव तालुका नियंत्रण पथक व गोंदिया तालुका नियंत्रण पथकाला द्वितीय पुरस्कार उत्कृष्ट प्रचार,प्रसिद्धीसाठी एकोडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना पुरस्कृत करण्यात आले. आमगावचे कार्यक्रम सहायक विद्या घारपिंडे यांना प्रोत्साहनपर उत्कृष्ट बीसीएम पुरस्कार, तालुका आशा संघटक, तालुका नियंत्रण पथकाचे अविनाश वराडे, डाटा एन्ट्रीचा पुरस्कार गोंदियाचे सुनील भांडारकर व तिरोडाचे भिमशंकर पारधी यांना देण्यात आला.

टॅग्स :docterडॉक्टर