आरोग्य सेवा देणे डॉक्टरांचा धर्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 05:00 IST2019-12-31T05:00:00+5:302019-12-31T05:00:32+5:30

सोमवारी (दि.३०) सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित डॉ.आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार व जिल्हा गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम सन २०१८-१९ अंतर्गत कायाकल्प पुरस्कार वितरण वितरण सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी एस.ई.हाश्मी यांनी केले.

The religion of doctors giving health care | आरोग्य सेवा देणे डॉक्टरांचा धर्म

आरोग्य सेवा देणे डॉक्टरांचा धर्म

ठळक मुद्देसीमा मडावी : आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : २४ तास आरोग्य सेवा देणे हे डॉक्टरांचे काम आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस काम करुन रुग्णांना सेवा देऊन आपला धर्म पाळावा. चांगल्या कामाची पावती ही पुरस्काराच्या माध्यमातून दिली जाते. असे उद्गार जि.प.अध्यक्ष सीमा मडावी यांनी काढले.
सोमवारी (दि.३०) सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित डॉ.आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार व जिल्हा गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम सन २०१८-१९ अंतर्गत कायाकल्प पुरस्कार वितरण वितरण सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी एस.ई.हाश्मी यांनी केले.
प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.उपाध्यक्ष अल्ताफ हमीद, आरोग्य व शिक्षण सभापती रमेश अंबुले, महिला बाल कल्याण सभापती लता दोनोडे, जि.प.सदस्य विजय लोणारे, जियालाल पंधरे, तेजुकला गहाणे, डॉ. अर्चना पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी श्याम निमगडे उपस्थित होते. सभापती रमेश अंबुले यांनी तिरोडा उपजिल्हा रुग्णालयाची प्रसंशा केली. डॉ. अर्चना पाटील यांनी या वेळी मार्गदर्शन केले.

केशोरीला दोन लाखांचा पुरस्कार
नक्षलग्रस्त दृष्ट्या अतिसंवेदनशील असलेल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी प्राथमिक आरोग्य केंद्राला कायाकल्प योजनेंतर्गत प्रथम पुरस्कार म्हणून दोन लाख रुपये देण्यात आले आहे. तिरोडा उपजिल्हा रुग्णालयाला डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आनंदीबाई जोशी पुरस्कारात प्राथमिक आरोग्य केंद्रातून भानपूर प्रथम, द्वितीय केशोरी प्राथमिक आरोग्य केंद्र,तृतीय शेंडा प्राथमिक आरोग्य केंद्र तर नऊ उपकेंद्रांना प्रोत्साहन पर पुरस्कार देण्यात आला.उपकेंद्रात दल्ली उपकेंद्राला १५ हजार, लाखेगाव १० हजार, फुलचूर ५ हजार,कायाकल्प योजनेंतर्गत कालीमाटी, शेंडा, महागाव, मुल्ला, काटी, ठाणा, दासगाव, चोपा या प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा प्रोत्साहनपर पुरस्कार व स्मृतिचिन्ह देऊन गौरविन्यात आले.

मातृवंदन योजनेत तिरोडा प्रथम
२ ते ८ डिसेंबर दरम्यान आयोजित प्रधानमंत्री मातृवंदन योजनेच्या सप्ताहात उत्कृष्ट काम करणाºया तिरोडा येथील तालुका नियंत्रण पथक, आमगाव तालुका नियंत्रण पथक यांना प्रथम पुरस्कार, गोरेगाव तालुका नियंत्रण पथक व गोंदिया तालुका नियंत्रण पथकाला द्वितीय पुरस्कार उत्कृष्ट प्रचार,प्रसिद्धीसाठी एकोडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना पुरस्कृत करण्यात आले. आमगावचे कार्यक्रम सहायक विद्या घारपिंडे यांना प्रोत्साहनपर उत्कृष्ट बीसीएम पुरस्कार, तालुका आशा संघटक, तालुका नियंत्रण पथकाचे अविनाश वराडे, डाटा एन्ट्रीचा पुरस्कार गोंदियाचे सुनील भांडारकर व तिरोडाचे भिमशंकर पारधी यांना देण्यात आला.

Web Title: The religion of doctors giving health care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :docterडॉक्टर