शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

त्या रूग्णाच्या नातेवाईकांचा पत्ताच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2021 5:00 AM

देवरी ग्रामीण रूग्णालयात १२ जुलै ही व्यक्ती (वय अंदाजे ५५) भर्ती झाली होती व त्यांच्या पायाला जखम झाली असून त्याला किडे लागल्याने त्यांना १३ जुलै रोजी १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेने येथील केटीएस रूग्णालयात पाठविण्यात आले. तेव्हापासून ते रूग्णालयात भर्ती असून त्यांच्या पायाच्या जखमेला किडे लागले होते. विशेष म्हणजे, हा रूग्ण स्वत:चे नाव किंवा अन्य काहीच माहिती देत नसून उपचारही करू देत नसल्याने त्यांना अवस्थपणा आली आहे. 

ठळक मुद्दे१३ जुलैपासून भर्ती : प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी घेतली दखल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  रस्त्यावर अवस्थेत असलेल्या एका इसमाला १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेव्दारे येथील केटीएस रूग्णालयात भर्ती करण्यात आले आहे. १३ जुलैपासून ते भर्ती असूनही अद्याप त्यांची विचारपूस करण्यासाठी कुणीही आलेले नाही. यामुळे त्यांच्या उपचारावर परिणाम पडत असून डॉक्टरांचीही अडचण होत आहे. माणूस हा सामाजिक प्राणी असून त्याला मोठ्या परिवारासह समाजात लोकांमध्ये वावरावेसे वाटते. यासाठीच त्याला मोठा परिवार लागत असून प्रसंगी परिवारच आपल्यासाठी धावून येणार अशी त्याचा समज असता. मात्र बदल्यात काळानुसार आता माणसाची प्रवृत्तीही बदलत चालली असून रक्ताचे नातेच आज रक्तासाठी धावून येत नसल्याच्या कित्येक घटना रोजच्या जीवनात घडत आहेत. असाच एक प्रकार उघडकीस आला असून येथील केटीएस रूग्णालयात भर्ती असलेल्या एका व्यक्तीची  साधी विचारपूस करण्यासाठी कुणीही आला नसल्याची माहिती आहे. देवरी ग्रामीण रूग्णालयात १२ जुलै ही व्यक्ती (वय अंदाजे ५५) भर्ती झाली होती व त्यांच्या पायाला जखम झाली असून त्याला किडे लागल्याने त्यांना १३ जुलै रोजी १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेने येथील केटीएस रूग्णालयात पाठविण्यात आले. तेव्हापासून ते रूग्णालयात भर्ती असून त्यांच्या पायाच्या जखमेला किडे लागले होते. विशेष म्हणजे, हा रूग्ण स्वत:चे नाव किंवा अन्य काहीच माहिती देत नसून उपचारही करू देत नसल्याने त्यांना अवस्थपणा आली आहे. शिवाय, त्यांच्या पायाची जखम वाढून शस्त्रक्रियेची गरजही येऊ शकते. मात्र यासाठी डॉक्टरांनाही त्यांच्या नातेवाईकांची गरज आहे. मात्र एवढे दिवस लोटूनही त्यांना बघण्यासाठीही कुणीही आलेले नाही. 

डॉक्टरांनी स्विकारली त्यांची जवाबदारी - रूग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर रोली गुप्ता, जय पवार यांना मागील ४ दिवसांपासून हा रूग्ण दिसून आल्याने त्यांनी कर्मचाऱ्यांना विचारपूस केली असता हा प्रकार उघडकीस आला. यानंतर त्यांनी रूग्णाला आपल्या जवळील जेवण देणे सुरू केले असून विचारपूस केली. मात्र ते काहीच सांगायला तयार नाही. यावर त्यांनी रूग्णालयात जेवणाची सोय करणारे लायंस क्लबचे प्रतीक कदम यांच्याशी संपर्क साधला तेथूनच हे प्रकरण पुढे आले. हा रूग्ण रूग्णालयातील सर्जरी वॉर्ड क्रमांक-१ मध्ये भर्ती असून कुणालाही काही माहिती मिळाल्यास संपर्क साधावा असे कदम यांनी कळविले आहे. 

 

टॅग्स :doctorडॉक्टरHealthआरोग्य