तृतीयपंथी कन्हय्या मौसीच्या घरावर नातेवाईकांचा कब्जा

By Admin | Updated: May 21, 2016 01:53 IST2016-05-21T01:53:19+5:302016-05-21T01:53:19+5:30

येथील तृतीयपंथी कन्हय्या मौसी यांचा १४ एप्रिल रोजी आजारामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला.

The relative of the third daughter Kanhaiya Aousi | तृतीयपंथी कन्हय्या मौसीच्या घरावर नातेवाईकांचा कब्जा

तृतीयपंथी कन्हय्या मौसीच्या घरावर नातेवाईकांचा कब्जा

गोंदिया : येथील तृतीयपंथी कन्हय्या मौसी यांचा १४ एप्रिल रोजी आजारामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांच्या दसखोली बजाज नगर येथील घरावर त्यांच्या नातेवाईकांनी कब्जा केल्यामुळे ते घर आपल्याला मिळावे यासाठी कन्हैय्या मौसीचा चेला निशाने शहर पोलीसात तक्रार केली आहे.
मागील २० वर्षांपासून आपण कन्हय्या मौसीची देखरेख करीत असून तिची सर्व सोय आपण करीत होतो. तिच्या मालमत्तेवर आपला हक्क असल्याचे तृतीयपंथी निशाचे म्हणणे आहे. कन्हय्या मौसीकडे ढोलक वादन करणारा व्यक्तीही २९ एप्रिल रोजी मरण पावला.
त्यावेळी निशा रायपूर येथे मोठ्या गुरुंना भेटायला गेली होती. त्यादरम्यान कन्हय्या मौसीचे भाचे दीपक चुटेलकर, राकेश चुटेलकर, बहीण गुड्डो व राजा या सर्वांनी कन्हैय्या मौसीच्या घरातील भांडी व दागिणे घेवून गेले. सोबत त्या घराला कुलूप लावले.
रायपूरवरुन परतलेल्या निशाने घराची किल्ली मागितल्यावर तिला दिली नाही. कन्हय्या मौसीने निशाला आपला वारसान असल्याचे मुद्रांकावर लिहून दिले असून आपल्या मालमत्तेवर निशाचा हक्क राहील, तसेच दागिणे व घराची विक्री निशाला करण्याचा अधिकार राहील असे लिहून दिले.
२० वर्षे नाचगाणे करून कन्हय्या मौशीला मदत करणाऱ्या निशाला आज घराचा हक्क मिळत नसल्याने तिने पोलिसात धाव घेतली आहे. न्यायालयात जाण्याची ऐपत नसल्यामुळे निशाने पोलिसांकडे धाव घेतली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The relative of the third daughter Kanhaiya Aousi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.