‘त्या’ तीनही नगरसेवकांच्या प्रकरणाची फेरसुनावणी

By Admin | Updated: January 10, 2015 01:32 IST2015-01-10T01:32:24+5:302015-01-10T01:32:24+5:30

तत्कालीन अपर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश रद्द करीत नागपूर खंडपिठाच्या उच्च न्यायालयाने येथील तीन नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांना फेरसुनावणीचे आदेश दिले आहेत.

A rehearsal of the case of the three corporators | ‘त्या’ तीनही नगरसेवकांच्या प्रकरणाची फेरसुनावणी

‘त्या’ तीनही नगरसेवकांच्या प्रकरणाची फेरसुनावणी

गोंदिया : तत्कालीन अपर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश रद्द करीत नागपूर खंडपिठाच्या उच्च न्यायालयाने येथील तीन नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांना फेरसुनावणीचे आदेश दिले आहेत. ६ जानेवारी रोजी न्यायालयाने दिलेल्या या आदेशामुळे भगत ठकरानी, ममता बंसोड व निर्मला मिश्रा यांना सदस्यत्व पुन्हा बहाल झाले आहे.
११ डिसेंबर २०१२ रोजी घेण्यात आलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षातील पाच सदस्यांनी लोकतांत्रीक कॉंग्रेस नामक वेगळा दबाव गट तयार केला होता. या पाच सदस्यांनी केलेल्या या कृत्यामुळे जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात एकच खळबळ माजली होती व संपूर्ण वातावरण ढवळून निघाले होते. कालांतराने हे पाचही सदस्य कॉंग्रेस पक्षात परतून आले होते मात्र यातील भगत ठकरानी, ममता बंसोड व निर्मला मिश्रा यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक अनिल पांडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. नगरसेवकांच्या पक्षांतराच्या या प्रकरणात तत्कालीन उप जिल्हाधिकारी कारकर यांच्याकडे सुनावणी सुरू होती.
याप्रकरणी कारकर यांनी ठकरानी, मिश्रा व बंसोड यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश दिला होता. या आदेशाची प्रत या सदस्यांनी २५ एप्रिल रोजी मिळाली व त्याविरोधात या तिघांनी नागपूर खंडपिठाच्या उच्च न्यायालयात अपील केली होती. आमची बाजू मांडू न देता जिल्हाधिकाऱ्यांनी आपला निर्णय सुनावल्याचा ठपका ठेवत तिघांनी दाखल केलेल्या अपीलच्या सुनावणीत न्यायालयाने या प्रकरणाची पुन्हा सुनावणी करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे या तिघा सदस्यांना त्यांचे सदस्यत्व पुन्हा प्राप्त झाले असून पालिके च्या कामकाजात आता ते पूर्वी प्रमाणेच सहभागी होऊ शकतील. (शहर प्रतिनिधी)

Web Title: A rehearsal of the case of the three corporators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.