दिलीप चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : भर उन्हाळ्यात पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे गावची गावे पाण्यासाठी भटकंती करीत असल्याचे चित्र आहे. गोरेगाव नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या पुनर्वसन भागातील नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरु असताना नगर पंचायत व निसर्ग मंडळाच्यावतीने टॅकरद्वारे येथे पाणी पुरवठा सुरु आहे.पुर्नवसन येथे ७०० नागरिकांचे वास्तव्य आहे. हा परिसर उंच भागावर वसला असल्यामुळे येथे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. या परिसरातील चार सार्वजनिक विहिरी व सहा बोअरवेलला पाणी नसल्याने याची झळ मात्र येथे राहणाºया कुटुंबाना सोसावी लागत आहे. येथील नगरसेवक रेवेंद्रकुमार बिसेन यांना पाण्याची समस्या लक्षात आल्यावर त्यांनी लगेच नगरपंचायतला कळविले. त्यानुसार, नगरपंचायतने रविवारी (दि.५) दोन टॅँकरची व्यवस्था करुन पाणी समस्येवर तात्पुरती मात केली. येथील ७०० नागरिकांना दोन टॅकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला.विशेष म्हणजे, येथील बरीच कूटूंब या पाणी टँॅकरपासून अनभिज्ञ असल्यामुळे त्यांना निसर्ग मंडळाच्या सदस्यांनी माहिती दिली. निसर्ग मंडळाचे सदस्य एवढ्यावरच थांबले नाही तर नगराध्यक्ष आशिष बारेवार व निसर्ग मंडळाचे अध्यक्ष रेखलाल टेंभरे, नगरसेवक हिरालाल रहांगडाले, नगरसेवक रेवेंद्रकुमार बिसेन, गुड्डू कटरे, अंकीत रहांगडाले, मोरेश्वर रहांगडाले, दिलीप चव्हाण यांनी काहींच्या घरी बादलीद्वारे स्वत: पाणी पोहचवून त्यांची सोय केली.पाणीटंचाई कायमचनगर पंचायत प्रशासनाने अनेक उपाययोजना करुनही पाणीटंचाई दूर करण्यात त्यांना अपयश आले. पुर्नवसन भागात चार विहिरी व सहा बोअरवेल आहेत. पण भर उन्हाळ्यात पाण्याच्या पातळीने तळ गाठल्यामुळे येथे पाण्याची समस्या कायम आहे. नगरपंचायतने अलीकडेच या विहिरींतून गाळाचा उपसा केला, पण पाण्याची पातळी खालावल्याने विहीरीत पाणीच नाही.
पुनर्वसन भागात पाणी पेटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 21:20 IST
भर उन्हाळ्यात पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे गावची गावे पाण्यासाठी भटकंती करीत असल्याचे चित्र आहे. गोरेगाव नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या पुनर्वसन भागातील नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरु असताना नगर पंचायत व निसर्ग मंडळाच्यावतीने टॅकरद्वारे येथे पाणी पुरवठा सुरु आहे.
पुनर्वसन भागात पाणी पेटले
ठळक मुद्देनागरिकांचे डोळे टँकरकडे : निसर्ग मंडळाने दिली घरपोच सुविधा