आरोग्याची नियमित तपासणी करावी

By Admin | Updated: February 25, 2015 00:16 IST2015-02-25T00:16:51+5:302015-02-25T00:16:51+5:30

वैद्यकीय क्षेत्रात नवीन नवीन आजार आढळत आहेत. त्याप्रमाणात औषधपचार व तपासणी केंद्र आपल्याकडे उपलब्ध नाही. मानवी शरीर अमुल्य आहे.

Regular health checks should be done | आरोग्याची नियमित तपासणी करावी

आरोग्याची नियमित तपासणी करावी

वरठी : वैद्यकीय क्षेत्रात नवीन नवीन आजार आढळत आहेत. त्याप्रमाणात औषधपचार व तपासणी केंद्र आपल्याकडे उपलब्ध नाही. मानवी शरीर अमुल्य आहे. संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. या आजारामुळे निरोगी माणूस एका झटक्यात आजाराचा बळी पडतो. म्हणून प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेणे आवश्यक़ निरोगी राहण्यासाठी घर व परिसर स्वच्छ ठेवणे व सार्वजनिक ठिकाणी होणारी अस्वच्छता टाळणे गरजेचे आहे. आजार जडण्यापुर्वी प्रत्येकाने वर्षातून दोनदा आरोग्याची नियमित तपासणी करून घ्यावे, असे आवाहन अस्थिरोगतज्ज्ञ डॉ.गोपाल व्यास यांनी केले.
ग्रामपंचायत कार्यालय व जेष्ठ नागरिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हनुमान वार्ड वरठी येथे मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप शिबिर घेण्यात आले. या शिबिराकरीता सनफ्लॅग आर्यन एण्ड स्टील कंपनीने सामाजिक दायीत्व अंतर्गत वैद्यकीय सेवा व औषध उपलब्ध करून दिली होती.
उद्घाटन सरपंच संजय मिरासे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून सनफ्लॅग कंपनीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश वहाने, प्राथमिक आरोग्य केंद्र वरठीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. टी.आय. अंसारी, डॉ. विवेक पत्की, बालरोग तज्ज्ञ डॉ. सुचिता वाघमारे, माजी उपसरपंच मनोज सुखानी, थारनोद डाकरे, नंदा सिरसाम, मनिषा मडामे, सुनिता बोंदरे, रक्त तपासणी तंत्रज्ञ कोमल भाजीपाले उपस्थित होते. या शिबिरात ४५० रुग्णाची तपासणी करून औषध वाटप करण्यात आले. रक्त शुगर, रक्तदाब तंत्रज्ञ कोमल भाजीपाले यांनी १५० महिला-पुरूषाची तपासणी केली. यात ब्लडशुगरचे रुग्णांना शासकीय दवाखान्यातून औषधोपचार करण्यात येणार आहे. संचालन जेष्ठ नागरिक संघटनेचे रविकुमार डेकाटे, प्रास्ताविक देवदास डोंगरे व आभार विष्णुपंत चोपकर यांनी मानले. कार्यक्रमास संघटनेचे उपाध्यक्ष हरीभाऊ भाजीपाले, बाबुराव साठवणे, नरेंद्र लिमजे, जागनाथ नंदनवार, कविता वरठे, विजय निमजे व रमेश देवगीरीकर उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Regular health checks should be done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.