१३ हजार पदवीधरांनी केली नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 06:00 AM2019-12-10T06:00:00+5:302019-12-10T06:00:13+5:30

जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार पदवीधर मतदार संघाच्या सदस्य नोंदणीसाठी १ नोव्हेंबर २०१६ पूर्वी पदवीधर झालेल्या सर्व शिक्षकांची नोंदणी करण्याची मोहीम शिक्षण विभागाने हाती घेतली आहे. यासाठी शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांनी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून १६ डिसेंबर पर्यंत शिक्षकांचे अर्ज भरवून तहसील कार्यालयात जमा करण्याचे पत्र काढले.

Registration made by 13 thousand graduates | १३ हजार पदवीधरांनी केली नोंदणी

१३ हजार पदवीधरांनी केली नोंदणी

Next
ठळक मुद्देपदवीधर मतदार संघ : आणखी संख्या वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : पदवीधर मतदार संघासाठी १ नोव्हेंबर २०१६ पूर्वी पदवीधर झालेल्यांना नोंदणी करण्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत १३ हजार पदवीधरांनी नोंदणी केली आहे. परंतु ही नोंदणी अत्यंत कमी असल्याने पुन्हा शिक्षकांमधील पदवीधरांना अर्ज भरण्यासाठी संधी देण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यात १ नोव्हेंबर २०१६ पूर्वी पदवीधर झालेल्या शिक्षकांची संख्या ६ हजार ९४० आहे. यातील शिक्षकांची संख्या वाढणार आहे.
जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार पदवीधर मतदार संघाच्या सदस्य नोंदणीसाठी १ नोव्हेंबर २०१६ पूर्वी पदवीधर झालेल्या सर्व शिक्षकांची नोंदणी करण्याची मोहीम शिक्षण विभागाने हाती घेतली आहे. यासाठी शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांनी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून १६ डिसेंबर पर्यंत शिक्षकांचे अर्ज भरवून तहसील कार्यालयात जमा करण्याचे पत्र काढले. गटशिक्षणाधिकारी तहसील कार्यालयातील अर्ज स्वत: मागवून पदवीधर शिक्षकांकडून ते भरवून घेणार आहेत. परंतु हे अर्ज भरताना या अर्जासाठी विद्यार्थ्यांची शाळा बुडणार नाही व अध्यापणावर कसलाही परिणाम होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
गटशिक्षणाधिकारी आपल्या स्तरावर प्रयत्न करून ते अर्ज भरवून घेण्याची संपूर्ण जबाबदारी सांभाळतील, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ८७५ पदवीधर शिक्षक, आमगाव ६५२, देवरी ६२४, गोंदिया २ हजार १३४, गोरेगाव ६७८, सालेकसा ५०४, सडक-अर्जुनी ६६३, तिरोडा ८१० असे एकूण सहा हजार ९४० शिक्षक पदवीधर आहेत. त्यांची सर्वांची नोंदणी करण्यात येणार आहे.

Web Title: Registration made by 13 thousand graduates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Votingमतदान