लोकमतने सामाजिक बांधिलकी जोपासली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:35 IST2021-07-07T04:35:56+5:302021-07-07T04:35:56+5:30
सडक-अर्जुनी : रक्ताची गरज लक्षात घेऊन कठीण परिस्थितीत लोकमत वृत्तपत्र समूह धावून आले आणि एका नावीन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात केली. ...

लोकमतने सामाजिक बांधिलकी जोपासली
सडक-अर्जुनी : रक्ताची गरज लक्षात घेऊन कठीण परिस्थितीत लोकमत वृत्तपत्र समूह धावून आले आणि एका नावीन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात केली. रक्तदान शिबिराचे आयोजन करुन खऱ्या अर्थाने लोकमतने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. रक्तदान शिबिरासाठी लोकमत समूहाने घेतलेला पुढाकार हा खरोखरच स्तुत्य असल्याचे प्रतिपादन सडक-अर्जुनी येथील दिवाणी व फौजदारी कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश विक्रम आव्हाड यांनी केले.
लोकमत समूहाच्या वतीने स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उर्फ बाबूृजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून सोमवारी (दि.५) स्थानिक एस. चंद्रा महाविद्यालय येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. शिबिराच्या सुरुवातीला स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उर्फ बाबूजी यांच्या छायाचित्राला डुग्गीपार पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन बांगडे यांनी माल्यार्पण करून आदरांजली अर्पण केली. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य रिता खोब्रागडे, एस.चंद्रा महाविद्यालय आमगावच्या प्राचार्य तृष्णा कळंबे, सीबीएससीच्या प्राचार्य रूपाली बिसेन, लोकमत इव्हेंटचे श्रीकांत पिल्लेवार, लोकमत तालुका प्रतिनिधी प्रा. राजकुमार भगत, डुग्गीपार पोलीस स्टेशनचे एपीआय संजय पांढरे, पीएसआय विनोद भुरेले उपस्थित होते. लोकमत समूह करीत असलेले रक्तदानाचे कार्य हे खरोखरच कौतुकास्पद आहे. खरी देश सेवा या कार्यातून दिसून येते आपण दान केलेले रक्त एखाद्या गरजवंताच्या कामात येऊन त्याचा जीव वाचेल हेच खरे रक्ताचं नातं असे ठाणेदार सचिन बांगडे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन लोकमत तालुका प्रतिनिधी प्रा. राजकुमार भगत यांनी केले, तर आभार लोकमत इव्हेंटचे श्रीकांत पिल्लेवार यांनी मानले. शिबिरात रक्तपेढी विभागाच्या मुख्य डॉ. पल्लवी गेडाम, डॉ. हर्षद शर्मा, टेक्निशियन आनंद पडोरे, स्टॉफ नर्स सृष्टी मुरकुटे, सहायक प्रतीक बन्सोड, विनोद बन्सोड व बाबुराव बोम्बार्डे यांनी काम पाहिले. यशस्वीतेकरिता प्रा. संतोष रामटेके, प्रा. आशिष रंगारी, प्रा. रोहित महादुले, प्रा. संजोग शेंडे, डॉ. जयंत रामटेके, डॉ. समीर महाजन, प्रा. चंद्रशेखर बोंबार्डे, डॉ. छाया लंजे, प्रा. भावना खापर्डे यांनी सहकार्य केले.
...................
न्यायाधीश, पोलीस निरीक्षकांनी केले रक्तदान
लोकमत रक्ताचं नातं या रक्तदान शिबिराला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी सडक-अर्जुनी येथे आयोजित शिबिरात सडक-अर्जुनी येथील दिवाणी व फौजदारी कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश विक्रम आव्हाड, डुग्गीपार पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन बांगडे व ४४ पोलीस कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. तसेच इतरांनी सुद्धा लोकमतने सुरू केलेल्या महायज्ञात सहभागी होण्याचे आवाहन केले.