पेट्रोल, डिझेलचे दर कमी करा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:34 IST2021-01-16T04:34:09+5:302021-01-16T04:34:09+5:30
बिरसी फाटा : मागील सहा सात महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. ...

पेट्रोल, डिझेलचे दर कमी करा ()
बिरसी फाटा : मागील सहा सात महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करण्यात याव्या या मागणीचे निवेदन तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.
केंद्रात भाजप सकार सत्तेवर आल्यापासून पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. यामुळे सामान्य जनतेला दैनंदिन जीवन जगताना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या किमती कमी कराव्या या मागण्यांचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. शिष्टमंडळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष वसीम शेख, तालुका अध्यक्ष देवेंद्र चौधरी, तालुका सचिव रोहित पटले, सरगम गजभिये, उमंग लोंडे, सोहेल सैय्यद, आशुतोष असाटी यांचा समावेश होता.