खर्च कमी करून लाभ वाढवावा लागेल
By Admin | Updated: June 11, 2015 00:53 IST2015-06-11T00:53:42+5:302015-06-11T00:53:42+5:30
कृषी कार्यात कधी मानसूनची अडचण तर कधी किड्यांचा प्रकोप यामुळे शेतकऱ्यांना शंभर टक्के उत्पन्न मिळत नाही, ...

खर्च कमी करून लाभ वाढवावा लागेल
नवीन तंत्राने शेती करण्याची गरज : उद्योगाप्रमाणे शेतीलाही सांभाळण्याची गरज
गोंदिया : कृषी कार्यात कधी मानसूनची अडचण तर कधी किड्यांचा प्रकोप यामुळे शेतकऱ्यांना शंभर टक्के उत्पन्न मिळत नाही, मात्र उत्पादन खर्चात वाढच होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने कृषी कार्य करण्याचा सल्ला या विषयातील जाणकार देत आहेत.
कृषी विभागातून मिळालेल्या माहितीनुसार, सन २०१४-१५ मध्ये अर्जुनी-मोरगाव क्षेत्रात ३४ हजार ७५२ हेक्टर जमिनीवर विविध प्रकारचे पीक लावण्यात आले होते. यापैकी ११४ किलोग्रॅम प्रति हेक्टर रासायनिक खताचा उपयोग करण्यात आला. त्यामुळे अर्जुनी-मोरगाव क्षेत्रातील शेतकऱ्यांना २१३०.६० किलोग्रॅम कृषी उत्पन्न प्राप्त झाले होते.
जिल्ह्याच्या आठ तालुक्यांपैकी अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी हे सिद्ध केले की, ते अधिक उन्नत तंत्रांचा वापर करून व रासायनिक खताचा उपयोग कमी करून जिल्ह्यात सर्वाधिक प्रति हेक्टर उत्पन्न घेत आहेत. गोंदिया तालुक्यात ४९ हजार ७८९ हेक्टर जमिनीत पीक घेण्यात आले.
यात शेतकऱ्यांनी १७१ किलोग्रॅम रासायनिक खताचा उपयोग केला. यात त्यांना १८२३.४७ किलोग्रॅम प्रति हेक्टर उत्पन्न प्राप्त झाले. या संख्या पाहून असे म्हटले जावू शकते की, शेतकरी केवळ उत्पन्न वाढविण्यासाठी रासायनिक खताचा अधिक वापर करीत नाही.
कृषी विभागाच्या अधिकाऱ्याने माहिती दिली की, आजसुद्धा शेवाल, गांढूळ खत बनविण्यासाठी राज्य शासन प्रोत्साहन देत आहे. परंतु शेतकरी याचा लाभ घेत नाही. या प्राकृतिक खतांमुळे जमिनीची उत्पादकता वाढते. तसेच खतासाठी होणार खर्च कमी केला जावू शकतो.
मानसूनची अनिश्चितता, पिकांवर रोग, वाढती रासायनिक खताची किमत या तीन बाबी लक्षात ठेवून उत्पादन खर्च कमी करूनच शेतकऱ्यांना आता आपला लाभ वाढवावा लागेल. शेतीलासुद्धा एक उद्योग समजून लाभ-हानी लक्षात ठेवून शेतकऱ्यांना शेती करावी लागेल. (प्रतिनिधी)