शक्तिप्रदर्शनासाठी ‘रेडिमेड कार्यकर्ते’

By Admin | Updated: September 29, 2014 00:46 IST2014-09-29T00:46:31+5:302014-09-29T00:46:31+5:30

विधानसभेच्या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या दिवसापासून प्रचार मोहीमेत आपली शक्ती अधिक आहे हे दाखविण्यासाठी अनेक उमेदवारांचा खटाटोप सुरू आहे. मात्र शक्ती प्रदर्शनात

'Redeemed activists' for power demonstration | शक्तिप्रदर्शनासाठी ‘रेडिमेड कार्यकर्ते’

शक्तिप्रदर्शनासाठी ‘रेडिमेड कार्यकर्ते’

बालकांचाही वापर : मजुरांना आणण्यासाठीही दिला जातो कंत्राट
गोंदिया : विधानसभेच्या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या दिवसापासून प्रचार मोहीमेत आपली शक्ती अधिक आहे हे दाखविण्यासाठी अनेक उमेदवारांचा खटाटोप सुरू आहे. मात्र शक्ती प्रदर्शनात अधिक गर्दी करण्यासाठी ‘रेडिमेड कार्यकर्ते’ आणले जात आहे. हे रेडिमेड कार्यकर्ते पुरविणारे काही कंत्राटदारसुद्धा सक्रिय झाले आहेत.
उमेदवारांचा खर्च वाढतो याकडे मात्र निवडणूक आयोगाचे लक्ष नाही. उमेदवार मजूरांना सरळ मजूरी न देता त्यांच्या गावातील आपल्या संबंधित व्यक्तीला ही मजुरी देतात. ते व्यक्ती आपापल्या गावातील मजूरांना त्यांच्या घरापर्यंत मजूरी पोहचवून देतात. आचारसंहितेचा भंग होऊ नये, आपल्यावर अधिक खर्च केल्याचा ठपका पडू नये यासाठी नियमाच्या आतच खर्च करण्याचा निव्वळ देखावा काही उमेदवारांकडून करण्यात येत आहे. अर्ज दाखल करण्यासाठी विविध गावातील मजुरांना गोळा करून महिलांना १०० ते १५० रूपये, पुरूषांना २०० रूपये व लहान मुलांना ५० रूपये रोज देण्यात येत असल्याची विश्वसनिय माहिती अनेक मजुरांनी नाव न सांग्याच्या अटीवर दिली आहे.
गोंदियाच्या संजय नगरातील एका बालकाने ५० रूपये मजुरीवर तीन तासासाठी आपण आपल्या मित्रांसोबत एका मिरवणुकीत गेल्याचे सांगितले. निवडणुकीचा खर्च लपविण्यासाठी मजूरांना देण्यात येणारी मजुरी उमेदवार संबंधित गावातील सरपंच किंवा त्या गावातील आपल्या सक्रिय कार्यकर्त्याकडे सोपवितात. काही ठिकाणी विशिष्ट कंत्राटदारच ही जबाबदारी घेत आहे. नामांकन दाखल करण्यापासून निवडणुकीच्या प्रचारापर्यंत अनेक मजूर आज एका उमेदवाराच्या तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या उमेद्वाराच्या रॅलीत सहभागी होत असतो. आपल्याला कोण मजुरी अधिक देईल याकडे त्यांचे लक्ष असते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 'Redeemed activists' for power demonstration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.