आणखी २१ पोलीस शिपायांची भरती

By Admin | Updated: May 3, 2016 02:11 IST2016-05-03T02:11:02+5:302016-05-03T02:11:02+5:30

रिक्त असलेल्या जांगापैकी ५० टक्के जागा भरण्याचे आदेश शासनाने दिल्यामुळे जिल्हा पोलीस विभागातर्फे रिक्त

Recruitment of another 21 policemen | आणखी २१ पोलीस शिपायांची भरती

आणखी २१ पोलीस शिपायांची भरती

गोंदिया : रिक्त असलेल्या जांगापैकी ५० टक्के जागा भरण्याचे आदेश शासनाने दिल्यामुळे जिल्हा पोलीस विभागातर्फे रिक्त पदांपैकी ५० टक्के म्हणजे ४० जागांसाठी पोलीस भरती घेण्यात आली. परंतु शासनाने ७५ टक्के जागा भरण्याचे पुन्हा पत्र पाठविल्याने आणखी २१ शिपाई पदासाठी भरती घ्यावी लागणार आहे.
जिल्ह्यात रिक्त असलेल्या जागांपैकी ५० टक्के जागा म्हणजेच ४० जागा भरण्यासाठी २९ मार्च पासून शारिरिक चाचणी घेण्यात आली. एप्रिल महिन्यात अंतीम निवड यादी प्रकाशित करण्यात आली. निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी होण्यापूर्वीच शासनाचे रिक्त पदांपैकी ७५ टक्के पोलिस शिपायांच्या जागा भरा असे आदेश आले. यामुळे गोंदिया जिल्ह्यात पुन्हा २१ जागा भरल्या जाणार आहेत.
परंतु या २१ जागांसाठी पुन्हा भरती घ्यायची की त्याच भरतीतील प्रतिक्षा यादीत असलेल्या उमेदवारांना संधी द्यायची यासंदर्भात गोंदिया पोलिस विभागाने शासनाला पत्र लिहीले आहे. शासनाला पाठविलेल्या पत्राचे उत्तर आल्यानंतर पुढची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. म्हणजे आता गोंदिया जिल्ह्याला ६१ पोलीस शिपाई मिळणार आहेत. (तालुका प्रतिनिधी)

प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना मिळू शकते संधी
४भरती प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागते. सर्व यंत्रणा एकाच कामात लागली असते. त्यात महिना ते दीड महिन्याचा कालावधी जातो. यासाठी नुकत्यात झालेल्या भरतीतील प्रतीक्षा यादीत असलेल्या उमेदवारांना संधी दिली जाऊ शकते. परंतु शासनाचे आदेश मिळाल्याशिवाय सांगणे कठिण आहे.

शासनाने रिक्त असलेल्या पोलीस शिपायांची पदे ७५ टक्के भरावी असे नुकतेच पत्र आल्याने पुन्हा भरती प्रक्रिया घ्यायची की, नुकत्याच झालेल्या भरतीतील प्रतिक्षा यादीत असलेल्या उमेदवारांना संधी द्यायची यासंदर्भात शासनाला माहिती (सल्ला) मागितली आहे. पत्राचे उत्तर आल्यावर पुढची कारवाई करू.
- सुरेश भवर
पोलीस उपअधिक्षक (गृह)गोंदिया.

Web Title: Recruitment of another 21 policemen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.