शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
3
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
4
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
5
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
11
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
12
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
13
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
14
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
15
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
16
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
17
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
18
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी

गोंदिया जिल्ह्यात दहा वर्षांत यंदा प्रथमच रेकार्डतोड धान खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 15:41 IST

धान उत्पादकांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात यंदा धान पिकासाठी अनुकुल वातावरण लाभल्याने उत्पादनात वाढ झाली आहे.

ठळक मुद्दे१२ लाख क्विंटल धान खरेदी पुन्हा दोन महिने शिल्लक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : धान उत्पादकांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात यंदा धान पिकासाठी अनुकुल वातावरण लाभल्याने उत्पादनात वाढ झाली आहे. त्यामुळेच शासकीय धान खरेदी केंद्रावर आत्तापर्यंत १२ लाख क्विंटल धान खरेदी झाली आहे. ही मागील दहा ते पंधरा वर्षातील सर्वाधिक खरेदी असून धान खरेदी केंद्र पुन्हा दोन महिने सुरू राहणार असल्याने यंदा खरेदीचा नवीन विक्रम स्थापन होण्याची शक्यता आहे.गोंदिया जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळातंर्गत हमीभावानुसार धान खरेदी केली जाते. यंदा धान खरेदीसाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे ५७ व आदिवासी विकास महामंडळाचे ४३ असे एकूण शासकीय धान खरेदी केंद्र जिल्ह्यात सुरू करण्यात आले. या केंद्रावर शासनाने जाहीर केलेल्या हमीभावानुसार अ दर्जाच्या धानाला १७७० ते सर्वसाधारण धानाला १७५० रुपये हमीभाव देऊन याच दराने धान खरेदी केली जात आहे. जिल्ह्यात मागील दोन तीन वर्षांच्या तुलनेत धान पिकांसाठी यंदा अनुकुल वातावरण मिळाल्याने धानाच्या उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला होता. तो धान खरेदीची आकडेवारी पाहता खरा सुध्दा ठरत आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर २ फेब्रुवारीपर्यंत एकूण १२ लाख ५ हजार क्विंटल धान खरेदी झाली आहे. ही मागील दहा पंधरा वर्षांतील सर्वाधिक खरेदी असल्याचे या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यापूर्वी २०१५-१६ मध्ये खरीप आणि रब्बी हंगामातील खरेदी मिळून १२ लाख १२ हजार क्विंटल धान खरेदीचा रेकार्ड आहे. मात्र यंदा केवळ खरीपातीलच धान खरेदी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत १२ लाख ५ हजार क्विंटल धान खरेदी झाली आहे. खरीपातील धान खरेदी ही मार्च महिन्यापर्यंत सुरू असते. यात उन्हाळी व रब्बी हंगामातील धान खरेदी जोडल्यास यंदा विक्रमी धान खरेदी होण्याची शक्यता वर्तविली जाते. जिल्ह्यातील शासकीय धान खरेदी केंद्रावर अजुनही धानाची आवक मोठ्या प्रमाणात सुरू असून खरेदीच्या आकड्यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ते काहीही असले तरी यंदा मात्र आत्तापर्यंत झालेल्या धान खरेदीने आजवरचे सर्व रेकार्ड मोडले आहे.पाच क्विंटल धानाची भरडाईशासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात येणाऱ्या धानाची राईस मिलर्स मार्फत भरडाई करुन त्याचा शासकीय स्वस्त धान्य दुकांना पुरवठा केला जातो. आत्तापर्यंत जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने १२ क्विंटल धान खरेदी केली असून त्यापैकी ५ लाख क्विंटल धानाची राईस मिलर्सने भरडाईसाठी उचल केली आहे.

३७ हजार शेतकऱ्यांना बोनसची प्रतीक्षाशासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनातर्फे दरवर्षी प्रती क्विंटल मागे बोनस दिला जातो. मात्र यंदा शासनाने अद्यापही बोनसची घोषणा केलेली नाही. लगतच्या छत्तीसगडमध्ये सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारने धानाला प्रती क्विंटल २५०० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. त्यातुलनेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सध्या मिळत असलेला दर फार कमी असून प्रती क्विंटलमागे ८०० रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी राज्य सरकार धानाला ५०० रुपये बोनस जाहीर करुन त्याचा निवडणुकीच्या तोंडावर फायदा करुन घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

टॅग्स :agricultureशेती