शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
2
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
3
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
4
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
5
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
6
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
7
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
8
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
9
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
10
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
11
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
12
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
13
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

रेकॉर्ड ब्रेक २८५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 5:00 AM

बुधवारी आढळून आलेल्या २८५ कोरोना बाधित रुग्णांमध्ये सर्वाधिक १७९ रूग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत पॉझिटिव्ह आढळलेल्या रूग्णांची तालुकानिहाय आकडेवारी बघितल्यास गोंदिया तालुक्यात २२४६, तिरोडा ५७३, गोरेगाव १३९, आमगाव २६२, सालेकसा १०५, देवरी १६७, सडक-अर्जुनी ११२, अर्जुनी-मोरगाव १६२ आणि बाहेर जिल्हा व इतर राज्यात आढळलेले ७४ रुग्ण असे एकूण ३८४० रुग्ण बाधित आढळले आहे.

ठळक मुद्दे३८५ रुग्ण औषधोपचारातून बरे : एका बाधित रुग्णाचा मृत्यू, गोंदिया नंतर आता तिरोडातही जनता कर्फ्यू

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना विषाणूचा संसर्ग जिल्ह्यात मोठया प्रमाणात वाढत असतानाच बुधवारी (दि.१६) आतापर्यंतचे सर्वाधिक २८५ नवे रूग्ण मिळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यासाठी अधिकच गंभीर बाब ठरत आहे. मात्र यासोबतच तब्बल ३८५ कोरोना बाधित रुग्ण औषधोपचारातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. जिल्हयात आतापर्यंत २२६६ रुग्णांनी मात केली आहे. आता रूग्ण संख्या ३८४० झाली आहे. तर क्रियाशील रूग्णसंख्या १५१८ झाली असून एकूण ५६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्हयात आतापर्यंत प्रयोगशाळा चाचणीतून २५८० नमुने आणि रॅपिड अँटिजेन चाचणीतून १३८६ नमुने असे एकूण ३९६६ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले.बुधवारी आढळून आलेल्या २८५ कोरोना बाधित रुग्णांमध्ये सर्वाधिक १७९ रूग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत पॉझिटिव्ह आढळलेल्या रूग्णांची तालुकानिहाय आकडेवारी बघितल्यास गोंदिया तालुक्यात २२४६, तिरोडा ५७३, गोरेगाव १३९, आमगाव २६२, सालेकसा १०५, देवरी १६७, सडक-अर्जुनी ११२, अर्जुनी-मोरगाव १६२ आणि बाहेर जिल्हा व इतर राज्यात आढळलेले ७४ रुग्ण असे एकूण ३८४० रुग्ण बाधित आढळले आहे. तर ज्या ३८५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे यामध्ये गोंदिया तालुक्यातील ३२७, तिरोडा २०, गोरेगाव १२, आमगाव ५, सालेकसा ३, देवरी तालुका १०, सडक-अर्जुनी ५ व अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ३ रुग्णांचा समावेश आहे. जिल्हयात आतापर्यंत २२६६ रुग्णांनी मात केली आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यातील १३८६, तिरोडा ३४२, गोरेगाव ६४, आमगाव १४१, सालेकसा ६०, देवरी ७७, सडक-अर्जुनी ७९, अर्जुनी-मोरगाव १०९ आणि इतर ८ रुग्णांचा समावेश आहे.जिल्ह्यात कोरोना क्रियाशील रुग्ण संख्या आता १५१८ झाली असून तालुकानिहाय बघितल्यास गोंदिया तालुक्यात ८३१, तिरोडा २१९, गोरेगाव ७४, आमगाव ११६, सालेकसा ४४, देवरी ९०, सडक-अर्जुनी ३०, अर्जुनी-मोरगाव ५२ आणि इतर ६२ रूग्ण आहेत. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती बघता जनता कर्फ्यूसाठी व्यापारी पुढाकार घेत असल्याचे दिसून येत आहे.७६६ रूग्ण घरीच अलगीकरणातकोरोना क्रियाशील रुग्णांपैकी ७६६ रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. तालुकानिहाय बघितल्यास गोंदिया तालुक्यातील ५४५, तिरोडा ३७, गोरेगाव ३७, आमगाव ४१, सालेकसा ६, देवरी ५७, सडक-अर्जुनी २८, अर्जुनी-मोरगाव १५ व इतर ०० असे एकूण ७६६ क्रियाशील रुग्ण घरीच अलगीकरणात आहे.तिरोडा येथे रविवारपर्यंत बंदकोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव बघता तिरोडा येथील व्यापारी संघटनांनी गुरूवारपर्यंत (दि.१७) जनता कर्फ्यू पुकारला होता. मात्र कोरोनाची स्थिती काही आटोक्यात आली नसल्याने संघटनेच्यावतीने बुधवारी (दि.१६) नगर परिषदेला पत्र देत पुन्हा शुक्रवार (दि.१८) ते रविवारपर्यंत (दि.२०) बंद ठेवण्याचे विनंती पत्र दिले आहे. त्यानुसार, शुक्रवार ते रविवारपर्यंत (दि.२०) बाजारपेठ बंद ठेवण्याबाबत नगर परिषद मुख्याधिकारी अर्चना मेंढे यांनी पत्र काढले आहे.गोंदियात बंदला संमिश्र प्रतिसादयेथील बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी रविवारपासून (दि.१३) पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. मुख्य बाजारपेठेतील बहुतांश दुकानी बंद असतानाच काही व्यापारी आपल्या दुकानी उघडत असल्याचे दिसत आहे. मात्र बंदमुळे बाजारपेठेत एरवी दिसून येणारी गर्दी एकदमच कमी झाल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या दृष्टीने हे नक्कीच कोठेतरी फायद्याचे ठरणार यात शंका नाही.जिल्ह्यात ५६ रूग्णांचा मृत्यूजिल्हयात आतापर्यंत ५६ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये गोंदिया तालुक्यीतल २९, तिरोडा १२, गोरेगाव १, आमगाव ५, सालेकसा १, सडक-अर्जुनी ३, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १ व इतर ठिकाणच्या ४ रुग्णांचा समावेश आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या