अपघात विम्याची नोंद सेवापुस्तिकेत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:30 IST2021-03-27T04:30:09+5:302021-03-27T04:30:09+5:30
ज्यांचे दुय्यम सेवापुस्तक तयार आहे, ते अद्ययावत करून देण्यात यावे, ज्यांच्याकडे दुय्यम सेवापुस्तक नाही त्यांना सूचना आपल्या स्तरावरून देऊन ...

अपघात विम्याची नोंद सेवापुस्तिकेत करा
ज्यांचे दुय्यम सेवापुस्तक तयार आहे, ते अद्ययावत करून देण्यात यावे, ज्यांच्याकडे दुय्यम सेवापुस्तक नाही त्यांना सूचना आपल्या स्तरावरून देऊन बनवून देणे, सातव्या वेतन आयोगातील मंजूर झालेल्या वेतनश्रेणीची व वेतनाची नोंद सेवापुस्तिकेमधील मुख्य लेखा व वित्त अधिकारी जि.प. गोंदिया यांच्याकडून प्रमाणित करणे, हिंदी-मराठी भाषा सूट व स्थायी सेवेबाबतचे प्रस्ताव ज्या शिक्षकांनी सादर केले असतील अशा शिक्षकांचे प्रस्ताव पुढील कार्यवाहीकरिता पाठविणे, ज्या शिक्षकांची सेवा १२, तसेच २४ वर्षे पूर्ण झाले आहे, अशा शिक्षकांनी सादर केलेले प्रस्ताव चटोपाध्याय व निवडश्रेणी वेतनश्रेणीसाठी पुढील कार्यवाहीकरिता पाठविणे. जानेवारी-२००६ ला रुजू, नियुक्त कर्मचाऱ्यांची जानेवारी २००९ ते मार्च २००९ या तीन महिन्यांची रोखीने प्रदान करून निकाली काढणे, डीसीपीएसधारक शिक्षक बांधवांचे सातव्या वेतन आयोगानुसार दुसऱ्या हप्त्याच्या प्रदानामध्ये सर्व शिक्षकांचा (डीसीपीएसधारक) समावेश करणे, वैद्यकीय प्रतिपूर्ती बिल अनुदान प्राप्त होताच संबंधित शिक्षकांना त्वरेने प्रदान करणे, डीसीपीएसधारक शिक्षकांच्या नवीन क्रमांकाची (खातेधारकांच) नोंद सेवापुस्तिकेत करणे, उन्हाची वाढती तीव्रता व शाळांची विद्युत काही प्रमाणात खंडित असल्यामुळे शाळा सकाळच्या वेळी १ एप्रिलपासून करण्यात यावी, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश होता. शिष्टमंडळात तालुका अध्यक्ष संतोष पारधी, तालुका उपाध्यक्ष प्रवीण चौधरी, सचिव परमानंद रहांगडाले, पी.जी. खोब्रागडे, शिल्पा रंगारी, एस.ए. खरवडे यांचा समावेश होता.