शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
3
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
4
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
5
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
6
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
7
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
8
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
9
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
10
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
11
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
12
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

एकाच दिवशी ५२ बाधितांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2020 5:00 AM

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण १०२२९ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी ४६२ स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. तर ९५७५ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. १४१ स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्याप गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे. १४४ स्वॅब नमुन्याचा अहवाल अद्याप अनिश्चित आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा वाढतोय संसर्ग : तिरोडा आणि गोंदियात वाढले रुग्ण, कडक उपाययोजनांची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासून कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. बुधवारी (दि.५) एकाच दिवशी जिल्ह्यात ५२ कोरोना बाधितांची नोंद झाल्याने कोरोनाचा स्फोट झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून उपाययोजना राबविण्यात जिल्हा प्रशासन पूर्णपण अपयशी ठरले आहे.जिल्ह्यात बुधवारी आढळलेल्या ५२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सर्वाधिक ३८ रुग्ण तिरोडा तालुक्यातील आहे. यात मुंडिकोटा १०, घोघरा ३, बेलाटी खुर्द २३, गोंडामोहाडी २ रुग्ण, सडक अर्जुनी तालुक्यात तीन रुग्ण आढळले असून दोन रुग्ण हे हैदराबाद येथून आणि एक रुग्ण हा ठाणे येथून आलेला आहे. ११ रुग्ण हे गोंदिया शहरात आढळले असून यात रेलटोली ५, सिंधी कॉलनी १, गात्रा १, शास्त्री वार्ड १ आणि तीन रुग्ण कुडवा येथील आहे. कोरोना बाधित रुग्ण दररोज आढळून येत असल्यामुळे कोरोना क्रि याशील रुग्णांची संख्या १९१ झाली आहे. तर एक कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने तो घरी परतला आहे. तो रु ग्ण तिरोडा येथील आहे. आतापर्यंत एकूण २४६ कोरोना बाधितांना कोरोनावर मात केली आहे.कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण १०२२९ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी ४६२ स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. तर ९५७५ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. १४१ स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्याप गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे. १४४ स्वॅब नमुन्याचा अहवाल अद्याप अनिश्चित आहे.कोरोना बाधित रुग्णांचा त्वरीत शोध रॅपिड अँटीजेन टेस्टच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ३०४५ व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यामध्ये ३०१८ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. तर २७ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. तिरोडा आणि गोंदिया या दोन्ही ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात सरार्सपणे नियमाचे उल्लघंन केले जात आहे. बाहेरील जिल्ह्यातून नागरिक बिनधास्तपणे जिल्ह्यात प्रवेश करित आहेत. त्यांना कुठलीच रोकठोक नसल्याने आणि त्यांची आरोग्य तपासणी केली जात नसून ते थेट आपल्या घरी जात आहे. यातूनच कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात झपाट्याने वाढत आहे.गोंदिया शहरातील बाजारपेठेत गेल्यास लॉकडाऊन आहे की नाही असेच चित्र दिसून येते. बाजारपेठेत गर्दी होत असून फिजिकल डिस्टन्सिंगचे सुध्दा पालन केले जात नाही. मास्कचा वापर सुध्दा केला जात नसल्याचे चित्र आहे. जिल्हा प्रशासनाने सुरूवातीला काही दिवस कडक उपाययोजना केल्या. मात्र आता कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना याकडे दुर्लक्ष केले आहे.त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसंर्ग पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.नागरिकांनो ‘मी माझा रक्षक’ सूत्र आत्मसात कराजिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे.त्यामुळे नागरिकांनी आपल्या समोरचा व्यक्ती हा कोरोना बाधित आहे समजून खबरदारी घ्यावी. मीच माझा रक्षक हे सूत्र आत्मसात करुन फिजिकल डिस्टन्सिंग,मास्क, सॅनिटायझरचा वापर, वांरवार साबणाने हात धुणे, विनाकारण घराबाहेर पडू नये तसेच आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन लोकमतने केले आहे.तिरोडा येथे आजपासून तीन दिवस जनता कर्फ्यूमागील चार पाच दिवसांपासून तिरोडा येथील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. या तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दोनशेवर पोहचली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी स्थानिक नगर परिषदेने ६ ते ८ आॅगस्ट दरम्यान जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे. त्यामुळे तिरोडा शहरातील सर्व बाजारपेठ आजपासून तीन दिवस बंद राहणार असल्याचे नगराध्यक्ष सोनाली देशपांडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.क्वारंटाईन केंद्रातील गैरसोयींकडे दुर्लक्षजिल्ह्यात बाहेरील राज्य आणि जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना शहरातील चार पाच ठिकाणी स्थापन केलेल्या क्वारंटाईन कक्षात ठेवले जात आहे. मात्र त्या ठिकाणी योग्य सोयी सुविधा दिल्या जात नसल्याने तेथे राहणे नागरिक पसंत करीत नाही. त्यामुळे बरेच जण बाहेरुन परतल्यानंतर त्याची माहिती प्रशासनाला न देता थेट घरी पोहचत आहे.यातूनच कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.क्वारंटाईन केंद्राबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आल्या मात्र त्याची दखल घेतली जात नसल्याची नागरिकांची ओरड आहे. विशेष तीन दिवसांपूर्वी लोकमतने कोविड केअर सेंटर परिसरातील जैविक कचºयाची विल्हेवाट लावली जात नसल्याचा मुद्दा उघडकीस आणला होता.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या