जिल्ह्यात १० विंधन विहिरींना मान्यता

By Admin | Updated: May 22, 2016 01:32 IST2016-05-22T01:32:59+5:302016-05-22T01:32:59+5:30

पाणी टंचाई उपाययोजना सन २०१५-१६ अंतर्गत जिल्ह्यात १० नवीन विंधन विहिरी तयार करण्याच्या कामाला जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे.

The recognition of 10 wells wells in the district | जिल्ह्यात १० विंधन विहिरींना मान्यता

जिल्ह्यात १० विंधन विहिरींना मान्यता

गोंदिया : पाणी टंचाई उपाययोजना सन २०१५-१६ अंतर्गत जिल्ह्यात १० नवीन विंधन विहिरी तयार करण्याच्या कामाला जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. यासाठी १० लक्ष १९ हजार ४१० रु पयांचा खर्च येणार आहे.
या कामांमध्ये आमगाव तालुक्यातील स्वामीनगर, गडमाता मंदिराजवळ, सडक/अर्जुनी तालुक्यातील वृंदावन टोला येथील जि.प.शाळेजवळ, सालेकसा तालुक्यातील कोल्हापूर टोली येथे अरविंद चौधरी यांच्या घराजवळ, गोरेगाव तालुक्यातील आसलपाणी येथील दुर्गा मंदिराजवळ, अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील माहुली येथे श्री करसाल यांच्या घराजवळ, घाटी पळसगाव येथे हनुमान मंदिराजवळ, बुधेवाडा येथे अंगणवाडी जवळ, तिरोडा तालुक्यातील सतोना येथे गाडगे मंदिर परिसराजवळ, मलपूर येथे भोलाजी अनकर यांच्या घराजवळ व डब्बेटोला येथील रामजी गौतम यांच्या घरासमोरील हनुमान मंदिराजवळ नवीन विंधन विहिरीचे कामे घेण्यात येणार आहे.
प्रत्येक विंधन विहिरीच्या कामावर १ लक्ष १ हजार ९४१ रु पये खर्च करण्यात येणार आहे. ही दहा कामे गावे व वाड्यामध्ये करण्यात येणार आहेत.(जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: The recognition of 10 wells wells in the district