विविध क्षेत्रातील सहा समाजरत्नांचा सत्कार ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:02 IST2021-09-02T05:02:35+5:302021-09-02T05:02:35+5:30

गोंदिया : प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदियाच्यावतीने विविध क्षेत्रात स्थापना दिनी जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पाच समाज समाजरत्नांचा ...

Reception of six Samajratnas from different fields () | विविध क्षेत्रातील सहा समाजरत्नांचा सत्कार ()

विविध क्षेत्रातील सहा समाजरत्नांचा सत्कार ()

गोंदिया : प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदियाच्यावतीने विविध क्षेत्रात स्थापना दिनी जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पाच समाज समाजरत्नांचा सत्कार कार्यक्रम बुधवारी (दि. १) रोजी सायंकाळी ६.३० वाजता स्थानिक ग्रॅन्ड सीता हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सामाजिक कार्यक्षेत्रातून जुगलकिशोर अग्रवाल, प्रशासन सेवेत अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले, शिक्षण क्षेत्रामध्ये प्रशांत बोरसे, साहित्य क्षेत्रात शशी तिवारी तर कृषी क्षेत्रातून जी. रघुपती राव यांचा सत्कार करण्यात येणार आहे. जिल्हा गौरव पुरस्काराने ज्येष्ठ पत्रकार वासुदेव साधवानी यांना सम्मानित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. परिणय फुके राहणार असून यावेळी प्रामुख्याने माजी आ. राजेंद्र जैन, आ. विनोद अग्रवाल, आ. मनोहर चंद्रिकापुरे, आ. सहषराम कोरोटे, आ. विजय रहांगडाले, न.प. अध्यक्ष अशोक इंगळे व अदानी विद्युत प्रकल्पाचे प्रमुख कांती विश्वास हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदिया अध्यक्ष अशी माहिती अध्यक्ष अपूर्व मेठी यांनी कळविले आहे.

Web Title: Reception of six Samajratnas from different fields ()