विद्यार्थ्यांसाठी वाचन कट्टा नवोपक्रम
By Admin | Updated: March 26, 2016 01:44 IST2016-03-26T01:44:11+5:302016-03-26T01:44:11+5:30
येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत वाचन कट्टा नवोपक्रमांंतर्गत वाचन कट्टा तैयार करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांसाठी वाचन कट्टा नवोपक्रम
इंदोरा बुज : येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत वाचन कट्टा नवोपक्रमांंतर्गत वाचन कट्टा तैयार करण्यात आला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा उपक्रम चालू आहे. या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत संपूर्ण शाळेत ज्ञानरचना वादी पद्धतीने, अध्यापन आस्थापन होत आहे. या अनुषंगाने विद्यार्थ्यांना अभ्यासात आनंद निर्माण व्हावा म्हणून वाचन कट्टा तयार करण्यात येत आहे.
वाचन कट्ट्याचे उद्घाटन शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष दिगंबर अंबुले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य लाखन राणे, विमला सोनेवाने, संगीता अंबुले, राजेंद्र बन्सोड, सरिता सोनेवाने, राजेंद्र अंबुले व पालक वर्ग उपस्थित होते. मुख्याध्यापक पी.एल. भगत यांनी उपस्थित पालकांना वाचन कट्टयाचे महत्व समजावून सांगितले.
विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची सवय लागावी यासाठी लोक सहभागातून वाचन कट्टा तयार करुन त्यातून गुणवंत विद्यार्थी घडविण्याचे काम यातून केले जाईल. गावकऱ्यांच्या व बालकांच्या मदतीने वाचन कट्टा तैयार करुन खुल्या वातावरणात विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची सवय व्हावी या मागचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले.
वाचन कट्ट्यात बसून दररोज विद्यार्थी गटचर्चा, सराव व कृतीयुक्त अध्ययन करतील असे शिक्षण विभागाचे उपक्रम असल्याही माहिती देण्यात आली. यावेळी सहाय्यक शिक्षक शैलेष कोचे, विजय पटले, अशोक बिसेन, आगासे, साकुरे, चंद्रवंशी विद्यार्थी-पालक उपस्थित होते.