गरजूंपर्यंत योजना पोहोचवा!

By Admin | Updated: September 29, 2016 00:19 IST2016-09-29T00:19:43+5:302016-09-29T00:19:43+5:30

तळागाळातील शोषित, पीडित, वंचितांना न्याय मिळवून देवून समाजात अंतिम घटकावरील व्यक्तीचा

Reach the plan to the needy! | गरजूंपर्यंत योजना पोहोचवा!

गरजूंपर्यंत योजना पोहोचवा!

विनोद अग्रवाल : पं. दीनदयाल उपाध्याय जयंती कार्यक्रम
गोंदिया : तळागाळातील शोषित, पीडित, वंचितांना न्याय मिळवून देवून समाजात अंतिम घटकावरील व्यक्तीचा विकास करुन त्याला मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य पं.दिनदयाल यांच्या प्रेरणेने पक्ष करीत आहे. कार्यकर्त्यांनी समाजातील गरजूपर्यंत योजना पोहोचवून गरिबांचे अश्रू पुसण्याचे कार्य करावे, असे आवाहन भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी केले.
ते भाजपा जिल्हा कार्यालयात पं. दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सोमवारी बोलत होते.
शहर अध्यक्ष सुनील केलनका यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत प्रामुख्याने नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, ग्रामीण मंडळ अध्यक्ष छत्रपाल तुरकर, जि.प. सभापती छाया दसरे, न.प. गटनेता दिनेश दादरीवाल, संपर्क प्रमुख संजय कुळकर्णी, भाजयुमो जिल्हाध्यक्ष पंकज रहांगडाले, भरत क्षत्रिय, दीपक कदम, जयंत शुक्ला, मनोहर आसवानी, महेश आहुजा, विनोद किराड, अशोक हरिणखेडे उपस्थित होते. सर्वप्रथम पं. दिनदयाल उपाध्याय यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करुन दीप प्रज्वलन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.
अग्रवाल पुढे म्हणाले, एकात्म मानववाद व अंत्योदयचे प्रणेते पं. दिनदयाल उपाध्याय यांच्या तत्व व आदर्शावर चालून भारतीय जनता पार्टी कार्य करीत आहे. पं. दिनदयाल उपाध्याय हे मोठे अर्थशास्त्री, समाजशास्त्री, साहित्यिक, वक्ता, लेखक व पत्रकार होते. ते एक महान विचारवंत व कुशल संघटक होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन समाजासाठी दिले असून त्यांनी आपल्या विचाराने देशाला नवी दिशा दिली. हे वर्ष त्यांच्या शंभराव्या जयंतीचे वर्ष आहे.
माजी पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांनी एकात्म मानववाद व अंत्योदयाच्या सिद्धांतावर चालून प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, अंत्योदय अन्न योजना, सर्व शिक्षा योजना, किसान क्रेडिट कार्ड योजना व अनेक जनकल्याणकारी योजना सुरू करुन देश्विकासाला चालना दिली होती. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन योजना, मुद्रा योजना, आवास योजना, कौशल्य विकास योजना, उज्वला योजना, जीवनज्योती योजना, स्वच्छ भारत अभियान, दिनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना व अंत्योदय योजना यासारख्या अनेक योजनांतून समाजातील शेवटच्या घटकाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व सर्वांगिण प्रगती साधण्याकरिता वेगाने वाटचाल सुरू झाली असल्याचे ते म्हणाले.
नगराध्यक्ष जायस्वाल यांनी सांगितले की आज शासनाने सुरू केलेल्या योजनांमुळे निश्चितच सर्वसामान्यांना न्याय मिळू लागले आहे.
नगर परिषदेच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी कार्य केले जात असल्याचेही ते बोलले. या वेळी तालुक्यातील लोहारा येथील ए.टी. मेश्राम यांनी पक्षात प्रवेश केला. त्यांचे स्वागत उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी केले. याप्रसंगी छत्रपाल तुरकर, दिनेश दादरीवाल, भरत क्षत्रिय, संजय कुलकर्णी, जयंत शुक्ला यांनीही मनोगत व्यक्त केले.
संचालन पंकज रहांगडाले यांनी केले. बैठकीस प्रामुख्याने शहर महामंत्री बाबा बिसेन, अशोक जयसिंघानिया, चंद्रभान तरोणे, धमेंद्र डोहरे, कुशल अग्रवाल, संजय मुरकुटे, अमित झा, पंकज सोनवाने, अहमद मणियार, अजित मेश्राम, मैथिली पुरोहित, धनंजय रिनायत, परसराम हुमे, रतन वासनिक, टिटूलाल लिल्हारे, एजाज शेख, अजय लौंगानी, सुभान रहांगडाले, राकेश लांजेवार, विनोद बन्सोडे, बबलू रहांगडाले, वजीर बिसेन, मिलिंद बागडे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Reach the plan to the needy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.