जिल्हा सांख्यिकी अधिकारी पदावर राऊत रुजू ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:35 IST2021-09-09T04:35:32+5:302021-09-09T04:35:32+5:30
गोंदिया : जिल्हा सांख्यिकी अधिकारी पदावर रुपेशकुमार राऊत हे मंगळवारी (दि. ७) रुजू झाले आहेत. राऊत यांचे शिक्षण एम. ...

जिल्हा सांख्यिकी अधिकारी पदावर राऊत रुजू ()
गोंदिया : जिल्हा सांख्यिकी अधिकारी पदावर रुपेशकुमार राऊत हे मंगळवारी (दि. ७) रुजू झाले आहेत. राऊत यांचे शिक्षण एम. एस्सी. (भौतिकशास्त्र), एम. एड्., एम. बी. ए. (फायनान्स), एम. ए. (अर्थशास्त्र) असे झाले असून, याशिवाय त्यांनी बॅचलर ऑफ जर्नालिझम तसेच भौतिकशास्त्रात सेट, मॅनेजमेंटमध्ये नेट, शिक्षणशास्त्रात नेट व अर्थशास्त्रात नेट उत्तीर्ण केले आहे. अर्थशास्त्रात त्यांची पी. एच. डी. सुरु असून, इंटरनॅशनल जर्नलमध्ये आतापर्यंत पाच रिसर्च पेपर प्रकाशित झाले आहेत. निराली प्रकाशन (पुणे) येथून राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी त्यांच्या एका पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे. सन २०१९पूर्वी शासकीय सेवेत दाखल होण्याआधी राऊत हे शिक्षण क्षेत्रात कार्यरत होते. अनेक वर्षे सीबीएसई शाळेत, पदवी महाविद्यालयात, पदव्युत्तर महाविद्यालयात तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयात तासिका तत्त्वावर भौतिकशास्त्र विषयाचे अध्यापन त्यांनी केले. तसेच प्राचार्य म्हणूनही काम केले आहे. सन २०१९ ते २०२१पर्यंत जिल्हा नियोजन समिती, चंद्रपूर येथे सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी म्हणूनही काम केले आहे.