शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
2
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
3
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
4
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
5
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
6
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
7
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
8
एज व्हेरिफिकेशन करताना इंटरनेट कंपन्यांच्या नाकी नऊ; खोट्या दाढी-मिशा लावून मुलं करतायत सिस्टिमची फसवणूक!
9
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
10
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
11
भारताचा दणका अन् चीनचा खोटारडेपणा! १ वर्षानंतर चीनने जगासमोर मान्य केलं ऑपरेशन सिंदूरमधील 'ते' सत्य
12
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
13
लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द 
14
Dividend Stock: एका शेअरवर ७५ रुपयांचा डिविडंड देतेय 'ही' दिग्गज कंपनी, रेकॉर्ड डेट निश्चित, ब्रोकरेजनं वाढवलं टार्गेट
15
लग्नानंतर २६ वर्षांनी आर. माधवनने सांगितली पुरुषांची 'मन की बात'! पत्नीकडून असतात 'या' अपेक्षा
16
तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास ५० लाख दंड! ट्रायचे कठोर पाऊल; नवीन नियमावलीचा मसुदा जाहीर
17
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
18
Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान
19
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
20
बऱ्याच दिवसांनी दिसला परश्या, पुण्यातील इव्हेंटमध्ये रिंकू-आकाशची हजेरी; नंतर दोघांची धमालमस्ती
Daily Top 2Weekly Top 5

रासेयो पथकाने बांधला गावालगत वनराई बंधारा

By admin | Updated: December 10, 2014 23:01 IST

येथील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे विशेष शिबिर १ ते ७ डिसेंबर या कालावधीत तालुक्यातील अरततोंडी/दाभना येथे घेण्यात आले. शिबिरांतर्गत रासेयो पथकाने

अर्जुनी/मोरगाव : येथील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे विशेष शिबिर १ ते ७ डिसेंबर या कालावधीत तालुक्यातील अरततोंडी/दाभना येथे घेण्यात आले. शिबिरांतर्गत रासेयो पथकाने अरततोंडी/दाभना लगतच्या वन परिसरात वन्य प्राणी व शेतकरी यांना पाणी मिळावे या दृष्टीने लगतच्या नाल्यावर श्रमदान करून वनराई बंधारा बांधला.
रासेयो पथकाच्या शिबिराचे उद्घाटन को-आॅप. बँकेचे संचालक भोजराज रहिले यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच सरिता पातोडे होत्या. तर उपसरपंच मोरेश्वर रहिले, उपप्राचार्य वीणा नानोटी, तंटामुक्त समिती अध्यक्ष विनोद हत्तीमारे, प्राथ. शाळा मुख्याध्यापिका आर.व्ही. गोंडाणे, भागवत मुनेश्वर, लीला ब्राह्मणकर, सुनीता मेश्राम, संदीप उईके, रासेयो प्रभारी प्रा. जे.डी. पठाण, प्रा. आर.व्ही. सूर्यवंशी, प्रा.ए.एम. नंदेश्वर, प्रा.नंदा लाडसे प्रामुख्याने उपस्थित होते.
शिबिरादरम्यान रासेयोच्या पथकाने नाल्याचे खोदकाम, गटारे स्वच्छ, रस्त्यांची डागडुजी इत्यादी कामे केली. बौद्धिक कार्यक्रमांतर्गत प्रा.ओ.डी. लांजेवार यांनी पर्यावरण व मानवी जीवन, प्रा. एस.जी. भोयर यांनी मानवी मूल्य व राष्ट्रीय सेवा योजना तर आरोग्य सेवक पी.एस. पातोडे यांनी स्वच्छता आणि आरोग्य इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले. एस. एस.जे. महाविद्यालयाचे प्रा. शरद मेश्राम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक सामाजिक क्रांतीचे पर्व या विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच विज्ञान व तंत्रज्ञान या विषयांवर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये पारस वंजारी, शिवानी जांभुळकर व इतर विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले.
रासेयो शिबिराचा समारोपीय कार्यक्रम सरपंच सरिता पातोडे यांच्या अध्यक्षतेत महागाव येथील शामाप्रसाद कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.बी.जी. पटले, शामराव बहेकार, जे.एस. राठी यांच्या उपस्थितीत पार पडला. सात दिवसीय शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य अनिलकुमार मंत्री यांच्या मार्गदर्शनात रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. पठाण, प्रा. अनिल नंदेश्वर, प्रा. रामदास सूर्यवंशी, प्रा. यादोराव बुरडे, प्रा. नंदा लाडसे, प्रा. योगेंद्र गौतम, प्रा. टी.एस. बिसेन, प्रा.संदीप भोयर, प्रा. कांबळे, रासेयो पथकाचे विद्यार्थी व अरततोंडी येथील ग्रामस्थांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे संचालन रासेयो पथक विद्यार्थी अंशुल भोवते यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. जे.डी. पठाण यांनी मानले.