शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

बलात्कारी संगीत शिक्षकाला ११ वर्षाचा सश्रम कारावास; जिल्हा व विशेष सत्र न्यायालयाचा निकाल

By नरेश रहिले | Updated: January 31, 2023 16:46 IST

१७ हजार रूपये दंडही ठोठावला

गोंदियासंगीतचे धडे देता-देता अल्पवयीन मुलीचे लैंगीक शोषण करणाऱ्या संगीत शिक्षकाला ३१ जानेवारी रोजी प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायालयाने ११ वर्षाचा सश्रम कारावास व १७ हजार रूपये दंड ठोठावला. नईम खान पठान (४०) रा. संत रविदास वार्ड, तिरोडा असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. ही सुनावणी प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांनी केली आहे.

आरोपी संगीत शिक्षक नईम खान पठान हा संगीत शिक्षक म्हणून तिरोडा येथे मुलांना संगीतचे धडे देण्याचे काम करित होता. पिडित मुलगी १४ वर्षाची आहे. ती इतर मुलामुलींसोबत आरोपीकडे येथे संगीतच्या शिकवणी वर्गाला सन २०१७ ते २०२० पर्यंत जात होती. पिडितेचे ही १४ वर्षाचे असल्याने आरोपीने पिडितेला प्रेमाच्या भुलथापा देऊन तसेच तिचे भविष्य बनवून देण्याचे आमिष दाखवून पिडितेचा वारंवार लैंगिक शोषण करित होता. ही घटना कुणालाही न सांगण्याकरिता बाध्य करित होता. याव्यतिरिक्त आरोपीने सप्टेंबर २०२० मध्ये पिडितेला पळवून नेले. तिचे लैंगिक शोषन केले. ही गोष्ट पिडितेच्या आई - वडिलाला माहिती झाल्यावर पिडितेच्या वडिलांनी ९ सप्टेंबर २०२० रोजी तिरोडा पोलिसात तक्रार केली.

या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे यांनी तपास करून आरोपीविरूध्द दोषारोप पत्र सादर केले. एकंदरित आरोपीचे वकील व सरकारी वकील यांच्या सविस्तर युक्तीवादानंतर प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश ए.टी. वानखेडे यांनी आरोपीविरूध्द सरकारी पक्षाचा पुरावा ग्राहय धरून आरोपी नईम खान पठान (४०) संत रविदास वार्ड, तिरोडा याला शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयात विशेष सरकारी वकील कृष्णा डी. पारधी यांनी काम पाहिले.न्यायालयाच्या कामकाजासाठी पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे व अप्पर पोलीस अधिक्षक अशोक बनकर यांच्या मार्गदर्शनात व पोलीस निरिक्षक दिनेश तायडे यांच्या देखरेखीत पैरवी कर्मचारी सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक शंकर साठवने यांनी काम पाहिले.

अशी सुनावली शिक्षा

भारतीय दंड विधानाचे कलम ३६३ अंतर्गत ३ वर्षांचा सश्रम कारावास व ५ हजार रूपये दंड व दंड न भरल्यास ४ महिन्याचा अतिरिक्त कारावास, भारतीय दंड विधानाचे कलम ३६६ अंतर्गत ५ वर्षांचा सश्रम कारावास व ७ हजार रूपये दंड व दंड न भरल्यास ४ महिन्याचा अतिरिक्त कारावास, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८ अन्वये ३ वर्षाचा सश्रम कारावास व ३ हजार रूपये व दंड न भरल्यास ४ महिन्याचा अतिरिक्त कारावास अशी एकुण १९ वर्षाचा सश्रम कारावास व एकूण १७ हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.

७ साक्षदार तपासले

या प्रकरणात जिल्हा व विशेष सत्र न्यायालयाने आरोपीविरूध्द दोष सिध्द करण्यासाठी सरकार, पिडित पक्षातर्फे विशेष सरकारी वकील कृष्णा डी. पारधी यांनी एकुण ७ साक्षदारांची साक्ष व इतर कागदोपत्री दस्तऐवज न्यायालयासामोर सादर केले.

दंडाची रक्कम पिडीतेला द्या

या प्रकरणातील विविध कलमांतर्गत १७ हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. ही दंडाची रक्कम पिडितेला देण्याचे आदेश दिले. सानुग्रह अनुदानाकरिता योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हा व विशेष सत्र न्यायालया ने दिले आहे.

टॅग्स :Courtन्यायालयMolestationविनयभंगCrime Newsगुन्हेगारीTeacherशिक्षकgondiya-acगोंदिया