दोडके जांभळी परिसरात रानगव्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:28 IST2021-04-24T04:28:52+5:302021-04-24T04:28:52+5:30
प्राप्त माहितीनुसार बीट वनरक्षक माया घासले या गस्तीवर असताना रानगवा मृत पावल्याची महिती मिळाली. महिती मिळताच सहायक वनसंरक्षक पंकज ...

दोडके जांभळी परिसरात रानगव्याचा मृत्यू
प्राप्त माहितीनुसार बीट वनरक्षक माया घासले या गस्तीवर असताना रानगवा मृत पावल्याची महिती मिळाली. महिती मिळताच सहायक वनसंरक्षक पंकज उईके, वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजित देशमुख, क्षेत्र सहायक रमेश लांबट, वनरक्षक माया घासले यांनी घटनास्थळाला भेट दिली. तो रानगवा फार कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे त्याला त्याच ठिकाणी जाळण्यात आल्याची महिती आहे. जांभळी, दोडके, डोंगरगाव डेपो परिसरात वन्यप्राण्यांच्या मृत्युच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पिण्याच्या पाण्याचे अभावाने प्राण्यांचा मृत्यू होत असल्याने जंगलामधील पाणवठ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
...... कोट
रानगवा पूर्णतः सडलेला असल्याने उत्तरीय तपासणीबरोबर करता आली नाही. त्यामुळे त्या रानगव्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नाही.
डॉ. श्रीकांत वाघाये पाटील, पशुधन विकास अधिकारी,