रानातील गुणकारी रानमेवा यंदा लांबला
By Admin | Updated: May 1, 2015 00:10 IST2015-05-01T00:10:53+5:302015-05-01T00:10:53+5:30
टेंभूर, चारं, बिबे, डिंक, जांभुळ, करवंद, आंबे, मोहफूल, चिंच, कवठं यासोबतच गुणकारी भाजीची फळे

रानातील गुणकारी रानमेवा यंदा लांबला
गोंदिया : जिल्ह्याला लाभलेल्या मोठ्या जंगल क्षेत्रात व इतरत्रही टेंभूर, चारं, बिबे, डिंक, जांभुळ, करवंद, आंबे, मोहफूल, चिंच, कवठं यासोबतच गुणकारी भाजीची फळे व शेंगा हा जंगलातील रानमेवा दरवर्षी मार्च मिहन्यापासून मे, जून महिन्यापर्यंत मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो. परंतु यावर्षी पडलेला कोरडा दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट व बदलत्या हवामानाचा परिणाम रानातील फळांवरही झाला आहे. यामुळे रानमेवा विकून पोटापाण्याचा प्रश्न भागविणारे कुटुंब हवालिदल झाले आहे.
मोलमजुरी करून आपला उदरिनर्वाह करणाऱ्याया डोंगर कपारीतील आदिवासींना शेतीचा हंगाम संपला की फेब्रुवारी, मार्च महिन्यात वनातील रानमेव्यापासून चांगला रोजगार मिळून आर्थिक लाभ होतो. टेंभूर व भाजीसाठी उपयुक्त फळ विकण्यापासून या हंगामाला सुरूवात होते. यानंतर चारं, चारोळी, डिंक, आवळा, करवंद, बिबुली, जांभुळ, मोहफूल, आंबा, फणस, विलायती चिंच, कवठं, गावरानी चिंच, मध याप्रमाणे रानमेवा विक्र ीला सुरूवात होते. यावर्षी एप्रिल मिहन्याचा शेवटचा आठवडा संपत असताना काही भआगात टेंबरं विक्रीला बाजारात आले आहेत. अवकाळी पाऊस व गारिपटीमुळे फळांचा मोहर व फुले गळून गेल्याने आणि वातावरणात वारंवार बदल होत असल्याने गतवर्षीच्या तुलनेत हे सर्व फळं कमी प्रमाणात उपलब्ध होणार आहे. मार्च महिन्यात चारे, बिबुली ही फळे विक्रीला येतात. मात्र एप्रिल महिना संपत असतानाही अद्याप कच्चीच फळे झाडाला लागलेली दिसून येत आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे व नैसिर्गक बदलामुळे फळांचा आकारही यावर्षी लहान झाला आहे. झाडातच ताकद न उरल्याने ही फळे मोठी होऊन पिकायला आणखी काही दिवस लागणार आहे. परिणामी यावर्षी प्रत्येक फळांचा हंगाम एक मिहना उशीराने सुरू होणार आहे. रासायनिक पद्धतीने पिकविलेली फळे मुलांना खाऊ घालण्यापेक्षा गुणकारी वन औषधी असलेला रानमेवा मुलांना खाऊ घालण्याकडे पालकांचा कल जास्त असतो. त्यामुळे या रानमेव्याला बाजारात भावही चांगला मिळतो.
जिल्ह्यातील बरेच कुटुंब या रानमेव्याच्या विक्र ीतून पोटापाण्याचा प्रश्न सोडवितात. आदिवासी बांधव या रानमेव्यातून हजारो रूपयाची आर्थिक उलाढाल करीत असतात. परंतु यावर्षी रानमेव्याचा हंगाम लांबल्याने आणि ही फळेही कमी प्रमाणात असल्याने या रानमेव्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबांना आर्थिक नुकसान झाले. (प्रतिनिधी)