धानपिकांवर खोडकिडीचा प्रादुर्भाव

By Admin | Updated: September 27, 2015 01:17 IST2015-09-27T01:17:26+5:302015-09-27T01:17:26+5:30

कृषी विभागाच्या देवरी उपविभागांतर्गत असलेल्या देवरी, सडक-अर्जुनी आणि अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील धानावर ...

Rampant incidence of rice seedlings | धानपिकांवर खोडकिडीचा प्रादुर्भाव

धानपिकांवर खोडकिडीचा प्रादुर्भाव

गोंदिया : कृषी विभागाच्या देवरी उपविभागांतर्गत असलेल्या देवरी, सडक-अर्जुनी आणि अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील धानावर खोडकिडी, तुडतुडे, गाधमाशीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले आहे. या किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठली आहे. धानावरील या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी देवरी उपविभागीय अधिकारी युवराज शहारे यांनी शेतकऱ्यांना काही उपाययोजना सुचविलेल्या आहेत.
खोडकिडीच्या नियंत्रणासाठी कार्टाप हाईड्रोक्लोराइड ५० एसपी, एक हजार ग्रॅम प्रति हेक्टर किंवा क्लोरात्रनिलीप्रोल १८.५ एस.सी. १५० मिली हेक्टर या प्रमाणात फवारावे. तुडतुड्यांकरीता इमिडाक्लोप्रिड १७.८ एस.एल., १२५ मिली. प्रतिहेक्टर किंवा एसिफट ७५ एस.पी. ७०० ग्रॅम प्रतिहेक्टर किंवा थायमिथोक्झाम २५ डब्लू.जी. १०० ग्रॅम प्रतिहेक्टर या प्रमााणत फवारावे. यावरही तुडतुड्यांची संख्या नियंत्रणात न आल्यास एका आठवड्यानंतर पुन्हा फवारणी करावी. एकाच कीटकनाशकाची पुन्हा पुन्हा फवारणी करु नये. गाधमाशीच्या नियंत्रणाकरीता दोणदार फिप्रोनिल ०.३ टक्के २५ किलो प्रतिहेक्टर अथवा दाणेदार फोरेट १० टक्के, १० किलो प्रतिहेक्टर याप्रमाणे टाकावे, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

Web Title: Rampant incidence of rice seedlings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.