बेधडक ट्रॅक ओलांडणे सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 22:05 IST2017-08-28T22:05:37+5:302017-08-28T22:05:58+5:30
रॅम्पवरून न चढण्याचा त्रास वाचविण्यासाठी रेल्वेच्या पायदळ पुलाचा वापर टाळून प्रवाशी बेधडकपणे ट्रॅक ओलांडून .....

बेधडक ट्रॅक ओलांडणे सुरूच
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : रॅम्पवरून न चढण्याचा त्रास वाचविण्यासाठी रेल्वेच्या पायदळ पुलाचा वापर टाळून प्रवाशी बेधडकपणे ट्रॅक ओलांडून एका फलाटावरून दुसºया फलाटावर जाण्याचा प्रयत्न करित असल्याचा प्रकार येथील रेल्वे स्थानकावर बºयाच दिवसांपासून सुरू आहे. यामुळे एखाद्यावेळेस मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गोंदिया रेल्वे स्थानकाचा विकास झपाट्याने होत आहे. शिवाय दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे मार्गावर सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे हे स्थानक असून येथून प्रवास करण्याºया प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. येथे ट्रॅक ओलांडताना अनेक अपघात घडले आहेत. हा प्रकार बंद व्हावा यासाठी स्थानकावर विविध सोयीसुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. प्लॅटफॉर्म-५ व ६ साठी रॅम्प तयार करण्यात आले आहे. प्लॅटफॉर्म-२ साठी रॅम्पचे बांधकाम सुरू आहे. तसेच ज्येष्ठ व दिव्यांग नागरिकांसाठी होमप्लॅटफॉर्मवर व प्लॅटफॉर्म-३ तथा ४ वर लिफ्टची सोय करण्यात आली आहे. तसेच होमप्लॅटफॉर्मवर एस्कलेटरचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र काही प्रवासी या साधनांचा वापर न करता पायी ट्रॅक ओलांडूनच जातात.
रेल्वे नियमांचे उल्लंघन होवू नये, रॅम्प व पादचारी पुलाचा वापर व्हावा. यासाठी रेल्वे प्रशासनाकडून इलेक्ट्रॉनिक उद्घोषणा वारंवार केली जाते. परंतु काही प्रवासी लवकरच स्थानकाबाहेर पडण्यासाठी या उद्घोषणेकडे दुर्लक्ष करतात व ट्रॅक ओलांडण्याचा प्रकार घडतो. मजिस्ट्रेट चेकिंगदरम्यान रेल्वे पोलीस किंवा जीआरपीचे कर्मचारी अशा प्रवाशांना पकडतात. त्यांच्यावर दंड आकारले जाते. तर काही प्रवासी गरीब असल्याने त्यांना सोडूनही दिल्या जाते. त्यावेळी पुन्हा असा प्रकार न करण्याचे पत्र त्यांच्याकडून लिहून घेतले जाते. तरी ट्रॅक ओलांडण्याचा प्रकार काही बंद होत नाही. गोंदिया रेल्वे स्थानकातून नागपूर, रायपूर, बालाघाट व चंद्रपूर या चारही दिशांनी रेल्वेगाड्या धावतात. त्यातच इतर प्रवाशांसह विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी अपडाऊन करतात. काही प्रवासी लवकर कार्यालयात पोहोचण्यासाठी तर काही लवकर घरी किंवा एखाद्या कामासाठी पोहोचण्यासाठी रेल्वेच्या नियमांचे उल्लंघन करतात. रॅम्प किंवा पायदळ पुलाचा वापर न करता सरळ फलाटावरून उडी घेवून ट्रॅक ओलांडून दुसºया फलाटावर पोहोचतात व स्थानकाबाहेर पडतात. शॉर्टकट पोहोचण्याचा हा प्रकार प्रवाशांच्या जिवावर बेतणारा आहे.
कर्मचाºयांचा अभाव
याबाबत रेल्वेचे अधिकाºयांशी संपर्क साधला असता, गोंदिया रेल्वे स्थानकात मनुष्यबळाचा अभाव आहे. स्थानकात थोड्याथोड्या वेळाने प्रवासी गाड्यांचे आगमन होते. गुन्हेगारी किंवा चोरीसारख्या घटना घडत असल्याने रेल्वे पोलीस किंवा जीआरपीचे कर्मचारी तिकडे जातात. अशावेळी प्रत्येक गाडीच्या आगमनाप्रसंगी प्रवाशांच्या कृत्यांवर लक्ष ठेवणे कठिण असते. शिवाय रेल्वे नियमांचे उल्लंघन होवू नये, यासाठी तशी उद्घोषणा केली जाते. तरीही प्रवाशांवर प्रभाव पडत नसेल तर हा त्यांचा स्वत:चा दोष आहे.
गोंदिया हे मोठे रेल्वे स्थानक आहे. मात्र मनुष्यबळाचा अभाव आहे. गुन्ह्याच्या घटनास्थळी रेल्वे पोलीस जातात. दर काही मिनिटांनी प्रवासी गाड्या येतात. त्यामुळे प्रवाशांवर दरवेळी लक्ष देणे शक्य नसते. ट्रॅक न ओलांडण्याची उद्घोषणा केली जाते. प्रवाशांनी रॅम्पचा व पादचारी पुलाचा वापर करावा. नियमांचे उल्लंघन करू नये. असे आढळल्यास कारवाई केली जाईल.
एच.एस. चौधरी,
मुख्य व्यवस्थापक, रेल्वे स्थानक, गोंदिया.