रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (झेंडा)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:50 IST2021-02-05T07:50:50+5:302021-02-05T07:50:50+5:30
प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रभूदयाल लोहिया, सदस्य सचिन लोहिया, शमिम अहमद सय्यद, मुख्याध्यापिका संयुक्ता जोशी, ...

रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (झेंडा)
प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रभूदयाल लोहिया, सदस्य सचिन लोहिया, शमिम अहमद सय्यद, मुख्याध्यापिका संयुक्ता जोशी, रामचंद्र भेंडारकर, राजकुमार भैसारे, भजनदास बडोले, अशोक कापगते,प्रल्हाद कोरे, ओ.बी. बिसेन, गुलाब शहारे, महादेव लाडे, राजकुमार भैसारे, दामोदर मेश्राम, नलीराम चांदेवार विद्यालयाचे प्राचार्य मा.मधुसूदन अग्रवाल, गुलाबचंद चिखलोंडे , मुख्याध्यापक मनोज शिंदे व पर्यवेक्षिका कल्पना काळे उपस्थित होत्या.
याप्रसंगी जगदीश लोहिया यांनी, आपणच आपल्या भाग्याचे शिल्पकार आहोत म्हणून जीवनात यशासाठी महत्तम प्रयत्न करा, असे मार्गदर्शन केले. प्राचार्य अग्रवाल तसेच जोशी यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व समजावून सांगितले व अभ्यासविषयक मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत व भाषणातून प्रजासत्ताक दिन व भारतीय गणराज्याचे महत्त्व विषद केले. कार्यक्रमात देशाच्या शहिदांवर श्रद्धांजली गीत सादर करण्यात आले व २ मिनिटांचे मौन ठेवून वीर शहीद जवान व सिरम इन्स्टिट्यूट येथील कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाला संस्था, संस्थेच्या व शाळेच्या समित्यांचे पदाधिकारी, सदस्य, पालक, गावकरी तसेच विद्यार्थी आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षिका यू. बी. डोये यांनी केले. आभार प्राचार्य गुलाबचंद चिखलोंढे यांनी मानले.