Rally in Gondia against CAA and NRC | सीएए व एनआरसी विरोधात गोंदिया येथे रॅली
सीएए व एनआरसी विरोधात गोंदिया येथे रॅली

ठळक मुद्देकायदा रद्द करण्याची मागणी : उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नागरिकता संशोधन कायदा रद्द करण्यात यावा, या मागणीला घेऊन वंचित बहुजन आघाडीने शुक्रवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. याला प्रतिसाद देत वंचित बहुजन आघाडीतर्फे शहरात रॅली काढून उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांना निवेदन देण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शहरातील जयस्तंभ चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन रॅलीला सुरूवात करण्यात आली. यानंतर ही रॅली गांधी प्रतिमा, चांदनी चौक, दुर्गा चौक, गोरेलाल चौक, नेहरू प्रतिमा येथून पुन्हा नियोजित स्थळी पोहचली. या ठिकाणी रॅलीचे रुपातंर सभेत झाले.
या वेळी केंद्र सरकारने एनपीए, सीएए कायदा रद्द करण्याची मागणी केली. सरकारी उपक्रमांचे खासगीकरण बंद करण्यात यावे. तसेच शासकीय मालमत्ता उद्योजकांना फार कमी दरात विक्री करण्याचा विरोध करण्यात आला. विद्यापीठांमध्ये सुरू असलेला असंतोष दूर करण्यात यावा. ओबीसींची जनगणना करण्यात यावी. आदी मागण्या करण्यात आल्या. या वेळी सभेला पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. तसेच विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांना दिले. शिष्टमंडळात प्रा.सतीश बंसोड, विनोद ए.मेश्राम, राजू राहुलकर, विनोद नांदुरकर, सिद्धार्थ हुमने, विनोद जे. मेश्राम, किरण फुले, प्रकाश डोंगरे, एस.डी.महाजन, नरेंद्र बोरकर, वामन मेश्राम, सुनीता भालाधरे, खूपचंद गजभिये, रूपदास मेश्राम, हरिदास साखरे, दिलीप डोंगरे, राजाराम चौरे, केशरीचंद गोंडाने, शालीकराम परतेकी, संजय भालाधरे यांचा समावेश होता.

Web Title: Rally in Gondia against CAA and NRC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.