एड्स निर्मूलनासाठी शहरात काढली रॅली

By Admin | Updated: December 2, 2015 02:02 IST2015-12-02T02:02:00+5:302015-12-02T02:02:00+5:30

जागतिक एड्स दिवस १ डिसेंबरनिमित्त जनजागृती कार्यक्रम कुंवर तिलकसिंह जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय गोंदिया, ...

Rally in city to eradicate AIDS | एड्स निर्मूलनासाठी शहरात काढली रॅली

एड्स निर्मूलनासाठी शहरात काढली रॅली

दृष्टी संस्थेचा पुढाकार : विद्यार्थ्यांसाठी वादविवाद, पोस्टर, निबंध स्पर्धा
गोंदिया : जागतिक एड्स दिवस १ डिसेंबरनिमित्त जनजागृती कार्यक्रम कुंवर तिलकसिंह जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय गोंदिया, दृष्टी बहुउद्देशिय विकास संस्था, जनशिक्षण संस्थान, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने पोस्टर स्पर्धा, निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, पथनाट्याचे आयोजन मुख्य बस स्टॅन्ड मरारटोली येथे सकाळी ९.३० वाजता करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य बस स्टॅन्ड व्यवस्थापक गौतम शेंडे होते. उद्घाटन माजी जिल्हा शासकीय वकील विणा बाजपेई, अतिथी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवि धकाते, जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डॉ.सुवर्णा हुबेकर, जिल्हा पर्यवेक्षक संजय जेणेकर, डॉ.चौरसिया, काळे, लक्ष्मीप्रसाद सामंत राय, नेतराम पारधी, आशा ठाकूर, सुदर्शना राकेश वर्मा, सरिता बुडेकर, सुनील येवले उपस्थित होते. यात समाजसेवी संस्था व बीएचजे कॉलेलच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.
एड्स निर्मूलनाचा शपथविधी कार्यक्रमात सर्व पाहुण्यांनी भाग घेतला. डॉ. रवि धकाते यांच्याद्वारे एड्स जनजागृती रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा श्रीगणेशा करण्यात आला. एड्स जनजागृती रॅली मरारटोली बस स्थानकापासून शहराच्या विविध मार्गाने घोषवाक्याच्या गजरात नैतिकता पाळा, एड्स टाळा, संयम से सुरक्षा, जवान हूँ, नादान नही, क्षणाची मजा एड्सची सजा, असता घरी सुंदर स्त्री का जात दुसऱ्याच्या घरी, जगा आणि जगू द्या, कंडोम वापरा एड्स टाळा, नाही लस नाही उपचार, प्रतिबंध हाच आधार, जागरुक व्हा सुरक्षित राहा आदी घोषवाक्यासोबत पंचायत समिती कॉलनी ते बालाघाट रोड मरारटोली बस स्टॅन्डमध्ये रॅलीचे समापन करण्यात आले.
समाजाचा भ्रम दूर हो, जन चेतना होणे अत्यावश्यक आहे या उद्देशाला घेऊन एड्स दिवसाचे पालन करण्यात आले.
संचालन व आभार प्रकाश बोपचे यांनी केले. यशस्वितेकरिता विनायक डोंगरवार, महेश बिसेन, अजय खवसकर, रिना डोंगरवार, विवेक करोले, शुभांगिनी बन्सोड, शशीकला तिवारी, रामू कोटांगले, दीपक उईके यांनी सहकार्य केले. विद्यार्थी सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Rally in city to eradicate AIDS