एक राखी सुरक्षिततेची एक राखी सम्मानाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:34 IST2021-08-25T04:34:06+5:302021-08-25T04:34:06+5:30

देवरी : बंदोबस्तावरील पोलिसांना सण साजरे करण्याचे प्रकार दुर्मीळच म्हणावे लागतील. रविवारी भावा-बहिणीच्या प्रेमाचा राखी पाैर्णिमेचा सण सर्वत्र साजरा ...

A rakhi of safety a rakhi of honor | एक राखी सुरक्षिततेची एक राखी सम्मानाची

एक राखी सुरक्षिततेची एक राखी सम्मानाची

देवरी : बंदोबस्तावरील पोलिसांना सण साजरे करण्याचे प्रकार दुर्मीळच म्हणावे लागतील. रविवारी भावा-बहिणीच्या प्रेमाचा राखी पाैर्णिमेचा सण सर्वत्र साजरा करण्यात आला. माजी जि.प. सभापती सविता पुराम यांच्या संकल्पनेतून एक राखी सुरक्षिततेची एक राखी सन्मानाची या उपक्रमातून देवरी तालुक्यातील देवरी, चिचगड, पोलीस स्टेशन व मगराडोह बोंडे येथील पोलिस कॅम्पमध्ये जाऊन भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना राखी बांधून राखीपाैर्णिमेचा सण आनंदाने साजरा करण्यात आला. नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागात बंदोबस्तात असणारे पोलीस बांधव भाजप महिला मोर्चाच्या या उपक्रमामुळे भारावून गेले. उपक्रमाकरिता तालुकाध्यक्ष देवकी मरई, महामंत्री सुनंदा बहेकार, महामंत्री स्वना उजवणे, सुषमा वैद्य, कौशल्या कुंभरे, शिंकू चोपकर, प्रज्ञा संगीडवार, राऊत, सुनीता जांभुळकर यांनी सहकार्य केले.

Web Title: A rakhi of safety a rakhi of honor