राज्यस्तरीय वुशू अजिंक्यपद स्पर्धेत चुरस

By Admin | Updated: September 27, 2016 02:47 IST2016-09-27T02:47:25+5:302016-09-27T02:47:25+5:30

येथे सुरू असलेल्या आमदार चषक १४ व्या राज्यस्तरीय वुशू अजिंक्यपद स्पर्धेत विविध जिल्ह्यातील

Raise the state-level Wushu Championship title | राज्यस्तरीय वुशू अजिंक्यपद स्पर्धेत चुरस

राज्यस्तरीय वुशू अजिंक्यपद स्पर्धेत चुरस

तिरोडा : येथे सुरू असलेल्या आमदार चषक १४ व्या राज्यस्तरीय वुशू अजिंक्यपद स्पर्धेत विविध जिल्ह्यातील खेळाडूंनी चांगलीच चुरस दाखविली. गेल्या दोन दिवसांपासून या खेळाचा तिरोडावायी आनंद घेत आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी आमदार विजय रहांगडाले तर प्रमुख पाहुणे म्हणून सोपान कटके, जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गोंगरेड्डीवार, डॉ. वसंत भगत, सुनील पालांदूरकर, सलाम शेख, संजय खियानी, खिलेश पारधी, सुनील शेंडे, संजय नागपुरे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी शिवछत्रपत्री क्रीडा पुरस्कारप्राप्त महासचिव सोपान कटके यांचा सत्कार करण्यात आला.
संपूर्ण राज्यातील विविध जिल्ह्यातील स्पर्धकांनी प्रात्याक्षिक दाखवून सर्वांना मंत्रमुग्ध केले. डॉ.सूर्यवंशी यांनी मुलांना स्वत:च्या बालपणातील आठवणी सांगून तिरोडासारख्या लहान शहरात राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन केल्याबद्दल प्रशंसा केली. आमदार रहांगडाले यांनी स्वत:चे रक्षण ज्या खेळामुळे करता येते अशा या खेळाचे आयोजन आपल्या येथे करण्यात आले असून पुढील काळात या प्रकारच्या राज्यस्तरीय आयोजनासाठी सदैव तत्पर राहण्याची घोषणा केली.
संचालन रंजनकुमार श्रृंगारपवार यांनी केले.
आभार सुनील ठाकरे यांनी मानले.
कार्यक्रमासाठी दीपक परजारे, विवेक मेश्राम, पंकज तिडके, राम बोधनकर, सुनील ठोकरे, चंदू प्रजापती, मुकेश शेंडे, अमन बैरीसाल, खुशाल पिंजरघरे, आकाश शहारे, निखील कावळे, राजकुमार पटले, निशा पांडे, कोमल रहांगडाले, सागर झाडे, चंद्रकांत मुरे, अमित रहांगडाले, निखील शेंडे यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Raise the state-level Wushu Championship title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.