चुलोद येथील बुद्ध विहारात वर्षावास उत्साहात ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:32 IST2021-08-24T04:32:39+5:302021-08-24T04:32:39+5:30

अध्यक्षस्थानी नवरगाव सर्कलचे अध्यक्ष ओंकार उके होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्कार प्रमुख नरेंद्र गजभिये, महासचिव हेमराज चंद्रिकापूरे, वासुदेव ...

Rainy season at Buddha Vihara in Chulod () | चुलोद येथील बुद्ध विहारात वर्षावास उत्साहात ()

चुलोद येथील बुद्ध विहारात वर्षावास उत्साहात ()

अध्यक्षस्थानी नवरगाव सर्कलचे अध्यक्ष ओंकार उके होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्कार प्रमुख नरेंद्र गजभिये, महासचिव हेमराज चंद्रिकापूरे, वासुदेव कठाणे, राजेश डोंगरवार, देवेंद्र रामटेके, सिद्धार्थ कोल्हे, श्रीकांत भालाधरे, नानाजी मेश्राम, हंसराज चौरे, कमलदास चंद्रिकापुरे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व बुद्ध वंदनेने झाली. यावेळी संस्कार मार्गदर्शक व प्रमुख वक्त्यांनी बुद्ध धम्म आचरणावर प्रकाश टाकून वर्षावासाचे महत्व पटवून दिले. तसेच बुद्ध धम्म समाजात रुजविण्यासाठी सर्वांनी अधिकाधिक प्रयत्न करून त्याचा प्रचार व प्रसार करावा असे सांगितले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने बौद्ध बंधू भगिनी व लहान मुले मुली उपस्थित होते. संचालन हेमराज चंद्रिकापुरे यांनी केले. आभार नानाजी मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमासाठी शैलेंद्र कोल्हे, सदाशिव कोल्हे, शामलाल भालाधरे, रवींद्र मेश्राम, अशोक चौरे, राष्ट्रपाल वैद्य, प्रतिमा भालाधरे, निर्मला मेश्राम, नम्रता चौरे, माया बोरकर, रक्षा भालाधरे, रश्मी वैद्य, आशा चौरे, इंदू कोल्हे, सुहानी कोल्हे, सिंधू भिमटे, सूर्यकांता नागदेवे यांनी सहकार्य केले.

Web Title: Rainy season at Buddha Vihara in Chulod ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.