पावसामुळे अनेक घरे बाधित
By Admin | Updated: July 28, 2014 23:37 IST2014-07-28T23:37:37+5:302014-07-28T23:37:37+5:30
शेतकऱ्यांचे नुकसान केल्यानंतर पावासाने हजेरी लावली. त्यामुळे बळीराजा काहिसा सुखावला. मात्र गावातील गोरगरीब संकटात सापडले. वादळी पावसामुळे परिसरातील १० गावांत शेकडो घरे अंशत:

पावसामुळे अनेक घरे बाधित
काचेवानी : शेतकऱ्यांचे नुकसान केल्यानंतर पावासाने हजेरी लावली. त्यामुळे बळीराजा काहिसा सुखावला. मात्र गावातील गोरगरीब संकटात सापडले. वादळी पावसामुळे परिसरातील १० गावांत शेकडो घरे अंशत: व पूर्णत: पडली. मात्र पडझड झालेल्या घरांच्या सर्वेक्षणात महसूल विभागात उदासीनता दिसून येत आहे.
तीन-चार दिवसांच्या वादळासह येणाऱ्या पावसामुळे माती व विटांचे असलेली कच्ची घरे आणि त्यात वास्तव्यास असलेल्या कुटुंबांची शुद्धच हरपली होती. पावसामुळे कच्च्या घरांच्या भिंती ओल्या झाल्या. त्या भिंती जोरदार येणाऱ्या वादळामुळे टिकाव धरू शकल्या नाहीत. संततधार पावसामुळे परिसरातील दहा गावांत शेकडो घरांची पडझळ झाल्याची माहिती गावातील पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
जवळच्या बेरडीपार येथील राधेश्याम ठाकरे, पांडूरंग बिसेन, सायत्रा राऊत, उंदिरवाडे, अरुण राऊत, धनराज पटले, सिदुलाल कोल्हटकर यांच्यासह १५ ते २० जणांची घरे पूर्र्णत: आणि अंशत: पडलेले आहेत. जवळच्या बरबसपुरा येथे दवन कटरे, रमेश बिसेन, यांच्यासह दहा ते बारा घरांची पडझळ झालेली आहे. काचेवानी हद्दितील अनुसया मोटघरे यांच्यासह ५ ते ७ घरांची पडझळ झालेली आहे. डब्बेटोला, गुमाधावडा व लगतच्या अनेक गावांत घरांची पडझड झाली असून ५० पेक्षा अधिक घरे जमीनदोस्त झाली आहेत. पूर्णत: तसेच अंशत: पडझड झालेल्या घरात कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत मिळाले नाही. मात्र परिसराच्या तलाठ्यांकडून माहिती काढली असता गावातील पडझळ झालेल्या घरांची निश्चित संख्या सांगण्यात आली नव्हती. अर्थात पडझड झालेल्या नागरिकांंकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष असल्याचे चव्हाट्यावर आले आहे. या विभागाने सर्व कामे बाजूला सारुन पडलेल्या घरांचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाईबाबत प्रस्ताव तयार करुन सहानुभूती दर्शविणे अपेक्षित होते. मात्र असे करण्यात आले नसल्याने गरिबांचे कोणीही नाही, असा आरोप अनेक पीडितांनी केला आहे. घरांची पडझड झाल्याच्या कारणासंबंधी विचारले असता यावर्षी आलेला पाऊस वादळवाऱ्यासह आल्याने पावसाच्या धारांचे संतुलन बिघडले आणि त्या भिंतीवर पडू लागल्या. त्यामुळे भिंती पावसाच्या पाण्याने भिजल्या व कमजोर होवून पडल्या, असे नागरिकांनी लोकमतजवळ सांगितले आहे. (वार्ताहर)