वर्षभरात रेल्वेला ३९.१२ कोटींचे उत्पन्न
By Admin | Updated: April 14, 2017 01:47 IST2017-04-14T01:47:53+5:302017-04-14T01:47:53+5:30
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे मार्गावर गोंदिया हे महत्त्वपूर्ण जंक्शन आहे. हे स्थानक सर्वाधिक उत्पन्न देणारे आहे.

वर्षभरात रेल्वेला ३९.१२ कोटींचे उत्पन्न
आरक्षण व तिकीट विक्री : गोंदिया स्थानकातून ६८ लाख ३१४ जणांचा प्रवास
देवानंद शहारे गोंदिया
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे मार्गावर गोंदिया हे महत्त्वपूर्ण जंक्शन आहे. हे स्थानक सर्वाधिक उत्पन्न देणारे आहे. मागील आर्थिक वर्षात २०१६-१७ मध्ये आरक्षण व सामान्य तिकीट विक्रीच्या माध्यमातून या स्थानकातून तब्बल ६८ लाख ३१४ प्रवाशांनी प्रवास केला. त्याद्वारे गोंदिया रेल्वे स्थानकाला ३९ कोटी १२ लाख ३८ हजार ८२७ रूपयांचे उत्पन्न मिळाले.
गोंदिया रेल्वे स्थानकाच्या विकासाचे काम सुरूच आहे. या स्थानकातून गोंदिया-रायपूर, गोंदिया-बालाघाट, गोंदिया-चंद्रपूर व गोंदिया-नागपूर चारही दिशांकडे प्रवासी गाड्या धावतात. त्यामुळे येथे दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळते. जवळपास २० हजार प्रवासी या स्थानकातून दररोज प्रवास करतात तर तेवढेच प्रवासी या स्थानकात उतरतात. त्यामुळे गोंदिया स्थानकाचे उत्पन्न दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे मार्गावर सर्वाधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.
१ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ या आर्थिक वर्षात सामान्य तिकिटांद्वारे या स्थानकातून तब्बल ६५ लाख चार हजार ९३६ प्रवाशांनी प्रवास केला. त्याद्वारे गोंदिया स्थानकाला २६ कोटी २६ लाख ३० हजार ११३ रूपयांचे उत्पन्न मिळाले. आरक्षित बोगींमधून आरक्षित तिकिटांद्वारे दोन लाख ९५ हजार ३७८ प्रवाशांनी प्रवास केला. त्याद्वारे स्थानकाला १० कोटी ८६ लाख आठ हजार ७१४ रूपयांचे उत्पन्न मिळाले.
सामान्य तिकिटांद्वारे एप्रिल २०१६ मध्ये सहा लाख २० हजार ७७० जणांनी प्रवास केला. त्याद्वारे दोन कोटी ४६ लाख ६७ हजार ८८४ रूपयांचे उत्पन्न मिळाले. मे मध्ये सहा लाख ४६ हजार ६२० जणांच्या प्रवासातून तीन कोटी १५ लाख ८४ हजार ८०४ रूपये, जून महिन्यात पाच लाख ५५ हजार २५९ जणांच्या प्रवासातून दोन कोटी २४ लाख एक हजार ०९९ रूपये, जुलैमध्ये चार लाख आठ हजार ५८० जणांच्या प्रवासातून एक कोटी ९३ लाख ६८ हजार ८५७ रूपये, आॅगस्टमध्ये पाच लाख १४ हजार ६३५ जणांच्या प्रवासी तिकिटांद्वारे दोन कोटी १९ लाख ३५ हजार २७९ रूपये, सप्टेंबरमध्ये पाच लाख ६९ हजार ०७२ जणांच्या प्रवासी तिकिटांद्वारे दोन कोटी ३७ लाख २७ हजार ७५५ रूपये, आॅक्टोबरमध्ये पाच लाख १९ हजार ५४६ जणांच्या प्रवासातून दोन कोटी १८ लाख ४१ हजार ११७ रूपये, नोव्हेंबरमध्ये पाच लाख ६८ हजार ५३२ जणांच्या प्रवासातून दोन कोटी ६२ लाख ४१ हजार २३९ रूपये, डिसेंबरमध्ये पाच लाख २६ हजार ०२७ जणांच्या प्रवासातून दोन कोटी ४० लाख ९६ हजार ६७३ रूपयांचे उत्पन्न मिळाले.
जानेवारी २०१७ मध्ये पाच लाख ५८ हजार २३९ प्रवाशांकडून दोन कोटी ४४ लाख ९० हजार ७५३ रूपये, फेब्रुवारीमध्ये चार लाख ९७ हजार २३२ जणांनी सामान्य तिकिटांच्या माध्यमातून प्रवास केला. त्याद्वारे दोन कोटी चार लाख ७४ हजार ०३३ रूपयांचे उत्पन्न मिळाले.
तर आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात मार्चमध्ये पाच लाख २० हजार ४२४ जणांच्या प्रवासातून दोन कोटी १८ लाख ५६६ रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे.