रेल्वे विभागाने केला १५ लाखांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 01:20 IST2017-09-01T01:20:24+5:302017-09-01T01:20:40+5:30

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे अंतर्गत १ ते २७ आॅगस्टपर्यंत विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले.

Railway Department recovers 15 lakh fine | रेल्वे विभागाने केला १५ लाखांचा दंड वसूल

रेल्वे विभागाने केला १५ लाखांचा दंड वसूल

ठळक मुद्दे६,५९९ प्रकरणांची नोंद : कचरा करणाºयांना २० हजार ६०० रूपयांचा दंड

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे अंतर्गत १ ते २७ आॅगस्टपर्यंत विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले. यात विनातिकीट, अनियमित प्रवास व माल बुक न करताच लगेज वाहून नेणे तसेच केरकचरा पसरविण्याचे प्रकरणे नोंद करण्यात आले. तसेच त्यांच्याकडून एकूण १५ लाख दोन हजार ७६५ रूपयांचे दंड वसूल करण्यात आले.
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळातर्फे मंडळ रेल्वे व्यवस्थापक अमितकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात व वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक अर्जुन सिबल यांच्या नेतृत्वात वाणिज्य विभागाच्या अधिकाºयांच्या पुढाकारात तिकीट निरीक्षक, वाणिज्य निरीक्षक व रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाºयांच्या सहकार्याने नियमितपणे विविध अभियान राबविण्यात येत आहेत.
या अंतर्गत १ ते २७ आॅगस्टपर्यंत राबविण्यात आलेल्या विशेष तिकीट तपासणी अभियानात विनातिकीट, अनियमित प्रवास तसेच मालबुक न करताच लगेजचे एकूण सहा हजार ५९९ प्रकरणे नोंद करण्यात आले. त्यांच्याकडून १४ लाख ८२ हजार १६५ रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
याशिवाय केरकचरा पसविल्याप्रकरणी एकूण २०८ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २० हजार ६०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. आॅगस्ट महिन्यात २७ तारखेपर्यंत एकूण १५ लाख दोन हजार ७६५ रूपयांचा दंड संबंधित प्रवाशांकडून वसूल करण्यात आला.
रेल्वेगाडी व स्थानकांवर वाढत्या घटनाना प्रतिबंध लागावा व रेल्वेमध्ये सुरक्षा बळकट व्हावी, यासाठी एडीआरएम डी.सी. अहिरवार यांच्या अध्यक्षतेत व इतर मुख्य रेल्वे अधिकाºयांसह मंडळ कार्यालयात जीआरपीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांच्यासह बैठक झाली.
यात प्रामुख्याने डोंगरगड ते गोंदिया मार्गादरम्यान समाजविघातक कार्य प्रतिबंधित करणे, आरपीएफ व जीआरपीद्वारे संयुक्तरित्या अनियमित प्रवास प्रतिबंधित करणे, अनधिकृत प्रवेशावर प्रतिबंध लावणे, जीआरपी व आरपीएफ स्टाफची रात्री गस्त लावणे, प्रवाशांच्या सामानांची चोरी प्रकरणांना प्राथमिकता देवून प्रवाशांना असुविधा होवू नये, याची खबरदारी घेणे, याबाबत एका संयुक्त निर्देश दिले आहे.

Web Title: Railway Department recovers 15 lakh fine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.